मुंबई: एअरटेल भारतातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी आहे आणि भारतात लवकरच याचे टॅरिफ प्लान महाग होत आहेत. ही माहिती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान दिली. त्यांनी सांगितले की भारतात लववकरच टेलिकॉम रेट्स वाढणार आहेत.
दरम्यान, मित्तल यांनी कोणतीही तारीख सांगितलेली नाही की ही वाढ कधी होणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार ही वाढ जुलैनंतर होऊ शकते.
२०२१नंतर नाही झालेत बदल
खरंतर, भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये डिसेंबर २०२१नंतर किंमतीमध्ये कोणतेही मोठे बदल झालेले नाहीत. देशात ४जी सुरू झाल्यानंतर दर २-३ वर्षांनी टॅरिफ वाढवण्याची एक सायकल सुरू झाली आहे.
भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये तीन मोठे खेळाडू आहेत. यांची नावे जिओ, एअरटेल आणि व्हीआय आहेत. दरम्यान यात बीएसएनएलला सामील केले जाऊ शकते. मात्र चार शहरांमध्ये बीएसएनएल नाही तेथे एमटीएनएल काम करते.
जिओ आणि व्हीआयही महाग करू शकतात का रिचार्ज?
अशातच असा सवाल केला जात आहे की जिओ आणि व्हीआयही आपले रिचार्ज प्लान महाग करू शकतात. खरंतर, प्रत्येक कंपनी आपल्या प्लान्सच्या किंमती वाढवत असेल तर इतर कंपन्याही त्यांचे दर वाढवतात.