
जामतारा: झारखंडमधील जामतारामध्ये रेल्वेची धडक बसल्याने २ जणाचा मृत्यू झाला आहे तर बरेच जण जखमी झाले आहेत. जामतारा आणि विद्यासागर या स्टेशनदरम्यान रेल्वेची रूळावरील काही प्रवाशांना धडक बसली. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी २ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, जामतारा अपघाताबद्दल ऐकून दु:ख झाले. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना कायम आहेत. जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो.
Pained by the mishap in Jamtara, Jharkhand. My thoughts are with all those who have lost their loved ones. May the injured recover soon: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 28, 2024
जामतारा ते विद्यासागर स्थानकादरम्यान बचाव मोहीम सुरू आहे. या मार्गावरून बंगळुरू-यशवंतपुर एक्सप्पेस डाऊनच्या दिशेने प्रवास करत असताना रूळाच्या बाजूला असलेली माती उडत होती. दरम्यान, प्रवाशांना वाटले की रेल्वेला आग लागली असून धूर निघत आहे. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी साखळी ओढली. तसेच रेल्वेतून प्रवाशांनी उड्याही मारल्या. याचवेळी बाजूच्या मार्गावरून ईएमयू ट्रेन जात होती. या ट्रेनखाली आल्याने काही प्रवाशांचा यात मृत्यू झाला.
रेल्वेने याबाबतचे निवेदन जाहीर केले. मात्र यात आगीचा कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. प्रवाशांनी अलार्म चेन खेचल्याने रेल्वे नंबर १२२५४ थांबवण्यात आली होती. यानंतर प्रवासी रेल्वेतून उतरले आणि दुसऱ्या रूळावर आले. मात्र त्याच वेळी दुसऱ्या रूळावरून जाणाऱ्या रेल्वे या प्रवाशांना धडक दिली.