Thursday, July 25, 2024
Homeब्रेकिंग न्यूजLoksabha Election : भाजपा देशात ३७७ आणि महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याचा झी मीडिया-मॅट्रिझच्या...

Loksabha Election : भाजपा देशात ३७७ आणि महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याचा झी मीडिया-मॅट्रिझच्या ओपिनिअन पोलमध्ये अंदाज

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) भाजपाने ‘अबकी बार ४०० पार’चा नारा दिला आहे. तर इकडे महाराष्ट्रातही महायुतीने ४५+ जागा जिंकण्याचा विडा उचलला आहे. यासाठी शिंदे-फडणवीस-पवारांनी अनेक डावपेच आखले आहेत. अनेक जागांवर दिग्गजांना धक्कातंत्र अवलंबण्याची तयारीही झाली आहे. त्यामुळे महायुती हे टार्गेट गाठू शकते, महायुतीचा ४५ जागांवर विजय होऊ शकतो, असा झी मीडिया-मॅट्रिझच्या ओपिनिअन पोलमध्ये अंदाज बांधण्यात आला आहे.

झी मीडिया-मॅट्रिझच्या ओपिनिअन पोलमध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला देशात ३७७ आणि महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीला देशात ९३ आणि महाराष्ट्रात केवळ तीन जागा जिंकता येऊ शकतात, असाही अंदाज बांधण्यात आला आहे.

देशात भाजपाने ३७० आणि एनडीएने ४००+ जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर महाराष्ट्रात एकूण ४५ जागांचे लक्ष्य ठेवले आहे. हेच लक्ष्य पूर्ण करण्यासाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या २३ जागांवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. आपल्या हक्काच्या २३ जागा पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपाने निवडणूक निरीक्षकांची नेमणूक केली आहे. विशेष म्हणजे या निवडणूक निरीक्षकामध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून अनेक दिग्गज नेत्यांच्या नावांच्या चर्चा सुरु आहेत. यामध्ये विशेषत: गिरीश महाजन, पंकजा मुंडे, आणि सुधीर मुनगंटीवार यांची नावे अग्रस्थानी असून राज्यातील २३ लोकसभा जागांसाठी निवडणूक निरिक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. यात पंकजा मुंडे यांच्याकडे उत्तर मुंबई, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे उत्तर पूर्व तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राज्यात सध्या महायुतीमध्ये भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. शिंदे यांनी १७ ते १८ जागांवर दावा केला आहे. तर शिंदेंएवढ्याच जागा आपल्याला मिळाव्या असा आग्रह अजित पवार यांनी धरला आहे. त्यामुळे या सगळ्यावर नेमका कसा तोडगा निघतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र एनडीएने भारतात ४०० आणि महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -