
नवी मुंबई (प्रतिनिधी)- महापालिकेच्या वतीने देण्यात येणारे शिष्यवृत्ती योजने पासून शहरातील गरीब व गरजू विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी शिष्यवृत्तीच्या प्रथम व द्वितीय टप्प्याची ऑनलाईन प्रक्रियेची वेबसाईट बंद न करता १ महिन्याची मुदतवाढ द्यावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
नवी मुंबई शहरातील गरीब व गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये म्हणून महापालिकेच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्याचे बँक पासबुक, उत्पन्नचा दाखला, जातीचा दाखला, शाळा व महाविद्यालया कडील घोषणापत्र तसेच इतर दस्तावेज साठी लागणारा कालावधी विचारात घेता गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पासून वंचित राहू नये यासाठी,
ज्या लाभार्थ्यांनी प्रथम टप्प्यात नोंदणी अर्ज भरलेले आहे, परंतु द्वितीय टप्प्यासाठी अपलोड करावयाचे आवश्यक पुरावे जमा करण्यासाठी विलंब होत आहे, अपलोड करण्याची अंतिम मुदत दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंतच आहे. सदरच्या मुदतीत जर वाढ केली गेली नाही किमान ४० हजारांहून अधिक लाभार्थी विद्यार्थी हे शिष्यवृत्ती नोंदणी करून देखिल त्यांना शिष्यवृत्ती योजने पासून वंचित राहावे लागेल.
शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज दाखल करताना ऑनलाईन अर्ज दाखल करताना येणाऱ्या अडचणी व कागदपत्र तयार करण्यासाठी लागणारा वेळ हे लक्षात घेता तसेच शिष्यवृत्ती योजने पसून गरजू विद्यार्थ्यां वंचित राहू नये यासाठी या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज दाखल करण्यास किमान १ महिना मुदतवाढ द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केले.