Saturday, July 13, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीGajanan Maharaj : भक्त प्रतिपालक श्री गजानन महाराज

Gajanan Maharaj : भक्त प्रतिपालक श्री गजानन महाराज

  • गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला

आवाजावरून मी त्यांना थोडेफार ओळखू शकलो. (कारण त्यांनी माझा फोन व खिशातील रक्कम काढताना माझ्या कानाजवळ बोलून मला तसे सूचित केले होते). ५-७ दिवस आयसीयूमध्ये राहून मी थोडा ठीक झालो. अकोला येथे घरी आल्यावर फिजिओथेरपी, मसाज, व्यायाम आणि औषधोपचार झाल्यावर मी खडखडीत बरा झालो. या सर्व काळात माझ्या आजारी असलेल्या आईला अमरावती येथे आणणे शक्य नव्हते. तिची समजूत घालण्याकरिता माझे मामा डॉ. सावदेकर हे अकोला येथील माझ्या घरी जावून आले व माझ्या आईची समजूत घातली. तसेच मला काहीच झालेले नाही, असा धीर देऊन तिचे सांत्वन केले. या सर्व दिवसांमध्ये माझी आई नित्यनियमाने श्री गुरू दत्तात्रयांचे घोर कष्टोद्धारण स्तोत्र पठण करीत असे. ही झाली माझ्या जीवनात घडलेली एक अनुभूती. आता येथे प्रश्न निर्माण होतो की, त्यादिवशी गाडीत धोतर आणि अंगरखा घातलेली वृद्ध व्यक्ती कोण? इतक्या रात्री “आज थंडी खूप आहे बाबा”, अशी जाणीव त्यांनी मला का बरे करून दिली असावी?

आरक्षणाच्या डब्यात अवचित आलेली आणि मला बघून माझी काळजी घेणारी व्यक्ती कशी आली?, की ज्यांनी अमरावतीपर्यंत माझी काळजी तर घेतलीच, पण त्यासोबतच “आपले अमरावती येथे कोणी नसेल तरीही काळजी करू नका. मी स्वतः यांना दवाखान्यात दाखल करेन व आपण लोक येईतोवर काळजी घेईन”, असा प्रेमपूर्वक दिलासा देखील दिला. दुसऱ्या दिवशी हे सद्गृहस्थ मला भेटावयास सुयश हॉस्पिटल येथे आले. त्यावेळी माझ्या खिशामधून काढलेली रक्कम, भ्रमणध्वनी भावास परत केला. माझा दृढ विश्वास या गोष्टीची निश्चिती पटवतो की, माझी ही सर्व व्यवस्था श्री गजानन महाराजांनीच लावून दिली आणि माझी तब्येत एकदम ठीक केली. श्री महाराजांची आणि श्री मारुतीराया यांची कृपाच मला या जीवघेण्या संकटातून वाचविण्यास कारणीभूत आहे. (क्रमश:)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -