Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीFire news: भाईंदरच्या आझादनगरमध्ये लागलेल्या आगीचा रुद्रावतार...

Fire news: भाईंदरच्या आझादनगरमध्ये लागलेल्या आगीचा रुद्रावतार…

भाईंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्ट भागातील आझादनगर झोपडपट्टीतील भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची घटना आज पहाटे सहाच्या सुमारास घडली आहे.  आग इतकी भीषण आहे, की त्या आगीच्या धुराचे लोट अनेक किलोमीटरपर्यंत पसरले आहेत. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक झोपडपट्टीत आग लागली. अद्याप ही आग नियंत्रणात आलेली नाही. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर तीन अग्नीशमन दलाच्या जवानांसह ५ जण जखमी झाले आहेत.

आगीच्या या भीषण घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दीपक चौरसिया मृत व्यक्तीचे नाव आहे. यामध्ये दोन लहान मुले जखमी झाले आहेत. तर, आगीत होरपळून अग्नीशमन दलाचे शिवाजी सावंत, संतोष पाटील, आणि हितेश असे तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

आगीतून बाहेर पडणारा काळा धूर परिसरात पसरला आहे. या भीषण आगीत अनेक झोपडया व गोदामे जळून खाक झाली आहेत. आग लागलेली जागा सामाजिक वनीकरण व मैदानासाठी राखीव असल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरातील सर्व बांधकामे अनधिकृत असल्याची माहिती आहे. महापालिका आयुक्त संजय काटकर व अन्य अधिकारी, पोलीस उपायुक्त घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अग्निशमन दलाकडून सध्या आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश मिळालेलं नाही. या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे. मुंबई, ठाणे आणि वसई महानगरपालिकेकडून अग्निशमन यंत्रे मागवण्यात आली आहेत, यावरून आगीची भीषणता लक्षात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -