Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीSangeet Natak Academy : अशोक सराफ आणि रुतुजा बागवे यांना संगीत नाटक...

Sangeet Natak Academy : अशोक सराफ आणि रुतुजा बागवे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

जाणून घ्या पुरस्कार विजेत्यांची नावे 

मुंबई : मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र शासनातर्फे ‘महाराष्ट्र भूषण’ (Maharashtra Bhushan) हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. यानंतर पुन्हा एकदा केंद्र सरकारतर्फे त्यांना बहुमान मिळणार आहे. संगीत नाटक अकादमीतर्फे (Sangeet Natak Academy) दिल्या जाणाऱ्या​फेलोशिप आणि पुरस्कारांच्या यादीत अशोक सराफ यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. यांसोबतच विख्यात शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली (Kalapini Komkali), अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe), ढोलकीवादक विजय चव्हाण (Vijay Chavan) यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला, इतर पारंपरिक समूह नृत्य, आदिवासी नृत्य क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना सन्मानित केले जाते. विविध कलाक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणारा हा एक सर्वोच्च भारतीय सन्मान आहे. काल रात्री उशिरा पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील कलाकारांचा समावेश आहे.

संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी :

– अशोक सराफ, अभिनय
– विजय शामराव चव्हाण, ढोलकीवादक
– कलापिनी कोमकली, हिंदुस्तानी शास्त्रीय सगीत
– नंदिनी परब गुजर, सुगम संगीत
– सिद्धी उपाध्ये, अभिनय
– महेश सातारकर, लोकनृत्य
– प्रमिला सूर्यवंशी, लावणी
– अनुजा झोकरकर, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक
– सारंग कुलकर्णी, सरोद वादक
– नागेश आडगावकर, अभंग संगीत
– ऋतुजा बागवे, अभिनय
– प्रियांका शक्ती ठाकूर, पारंपारिक कला

संगीत नाटक अकादमीच्या वतीने २०२३ या वर्षासाठी संगीत, नाटक, नृत्य क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा केली आहे. एक लाख रुपये आणि ताम्रपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -