Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीRohit Pawar : रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु!

Rohit Pawar : रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु!

राधाकृष्ण विखेपाटील यांचं वक्तव्य; काय आहे प्रकरण?

अहमदनगर : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे काही दिवसांपूर्वी म्हटले होते. यानंतर आज अहमदनगरमध्ये (Ahmednagar) माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती दिली. त्यामुळे आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तोंडावर रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत.

कोणतेही पुरावे नसताना तलाठी भरती प्रक्रियेबाबत भ्रष्टाचार झाला असल्याची टीका रोहित पवार यांनी केली होती. याच प्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचं राधाकृष्ण विखेपाटील यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले की, “तुम्ही एखादं बेताल वक्तव्य करता, मात्र जाहीरपणे त्याचे पुरावे मांडा. तुम्ही कोणाचे नातेवाईक आहे म्हणून तुम्हाला काहीही बोलण्याचं लायसन्स मिळालेलं नाही. पूर्वी आजोबा विधान करायचे आता नातवाने परंपरा पुढे नेण्याचे ठरवले आहे. आम्ही महसूल विभागामार्फत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु केलेली आहे. त्यामुळे पुरावे द्या अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जा”, असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.

राजेंद्र पवारांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर…

मला शरद पवारांनी राजकारणात येऊ दिलं नाही म्हणून अजित पवारांचा मार्ग सुकर झाला असं वक्तव्य राजेंद्र पवारांनी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं. याबाबत बोलतांना राधाकृष्ण विखेपाटलांनी म्हटलं की, “मी त्यांचं विधान ऐकलं नाही. मात्र, रोहित पवारांना तो सूचक इशारा असला पाहिजे की, फार धावपळ करू नको, जशी अजित दादांची फसवणूक झाली तशी तुझी देखील फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. हेच त्यांना त्यांच्या वक्तव्यातून सूचित करायचे असेल असे मला वाटते, असं विखेपाटलांनी म्हटलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -