मुंबई: मंगळवारी २७ फेब्रुवारीला भोजपुरी सिनेसृष्टीतून एक दुख:द बातमी समोर आली होती. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की पंचायत फेम अभिनेत्री आंचल तिवारी हिचे निधन झाले आहे. ती त्या ९ लोकांमध्ये सामील होती ज्यांचा २५ फेब्रुवारीला बिहारच्या मोहानिया येथे देवकली गावाजवळ एका रस्ते अपघातात मृत्यू झाला. मात्र आता अभिनेत्रीने तिच्या मृत्यूची बातमी अफवा असल्याचे म्हटले आहे. तसेच तिने म्हटले की ती जिवंत आहे.
आंचल तिवारीने पंचायतच्या सीझन २मध्ये प्रधानजींच्या मुलीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती चर्चेत आली होती. आता तिच्या मृत्यूच्या बातमीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र आंचलने स्वत:समोर येत तिच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे.
ती एकदम व्यवस्थित आहे. असे काहीही झालेले नाही. दरम्यान, ज्या आंचल तिवारीचा मृ्त्यू झाला ती भोजपुरी अभिनेत्री होती असे तिने स्पष्ट केले आहे.
आंचलने सोशल मीडियाच्या माध्यमातून निधनाची बातमी खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. तिने आपल्या मृ्त्यूची चुकीची बातमी फैलावल्याबद्दल निराशाही व्यक्त केली. सोबतच इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याबाबतची मोठी पोस्ट लिहिली आहे. व्हिडिओ शेअर करत तिने मी जिवंत आहे. एकदम व्यवस्थित आहे असे म्हटले आहे.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…