Monday, July 22, 2024
Homeमहामुंबईजहांगीर आर्ट गॅलरीत २८ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत प्रदर्शन

जहांगीर आर्ट गॅलरीत २८ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत प्रदर्शन

राज्यपालांच्या हस्ते ४७ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा सत्कार

मुंबई : दि बॉम्बे आर्ट्स सोसायटी या आशियाई उपखंडातील सर्वांत जुन्या ना नफा तत्वावरील कला संस्थेने आपल्या १३२ व्या ऑल इंडिया ॲन्युअल आर्ट एक्झिबिशनचे आयोजन जहाँगीर कलादालन, काळाघोडा, मुंबई येथे केले आहे. या दिमाखदार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ४७ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला लोकप्रिय अभिनेते व पद्मश्री पुरस्कार विजेते मोहन जोशी, बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील तसेच इतर मान्यवरदेखील उपस्थित होते. हे कला प्रदर्शन जहाँगीर कलादालन येथे २८ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२४ या कालावधीत पाहता येईल.

या वर्षीची बेंद्रे- हुसेन शिष्यवृत्ती कॅनव्हासवर तैलचित्र काढणाऱ्या कांचन गुळवेलकर यांना देण्यात आली तर कॅनव्हासवर ॲक्रिलिक आणि तैलचित्र काढणाऱ्या गणेश काळसकर यांना संध्या मिश्रा शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. शिल्पकार योगेंद्र कुमार मौर्य यांना आपल्या ब्राँझ माध्यमातील कामासाठी संगीता जिंदाल शिष्यवृत्ती देण्यात आली. यावर्षी ख्यातनाम शिल्पकार दिवंगत उत्तम पाचारणे यांना ‘रूपधर जीवनगौरव सन्मान’ प्रदान करण्यात आला असून मानपत्र आणि एक लाख रूपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

वैभव मोरे यांच्या बेसॉल्टमधील शिल्पासाठी त्यांना गव्हर्नर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक लाख रूपये रोख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. वैभव आठले यांना त्यांच्या कॅनव्हासवरील त्यांच्या सुंदर जलचित्रांसाठी ५१ हजार रूपये रोख, मानपत्र आणि सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले.

संघपाल म्हस्के, मंगेश कुंभार, अनिकेत गुजारे, विवेक कुमार साहनी, वैभव गायकवाड, तन्मय बॅनर्जी आणि इतरांनी प्रदर्शनासाठी सादर केलेल्या कलाकृती अत्यंत चमकदार होत्या. त्यांना जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये आयोजित कार्यक्रमात विविध पुरस्कार देण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -