Sunday, July 14, 2024
Homeदेशराज्यसभेच्या १५ जागांसाठी ३ राज्यांमध्ये आज मतदान

राज्यसभेच्या १५ जागांसाठी ३ राज्यांमध्ये आज मतदान

नवी दिल्ली: देशात ३ राज्यांमध्ये १५ राज्यसभा जागांसाठी मंगळवारी मतदान होत आहे. असे राज्य जिथे मतदान होत आहे त्यात उत्तर प्रदेशच्या १०, कर्नाटकच्या ४ आणि हिमाचल प्रदेशमधील एका जागेचा समावेश आहे.

खरंतर, १५ राज्यांमध्ये राज्यसभेच्या ५६ जागा रिकामी आहे. यातील १२ राज्यातील ४१ राज्यसभेच्या जागांवर उमेदवार बिनविरोध निवडण्यात आले आहे. या राज्यसभेच्या जागेसाठीचे मतदान सकाळी ९ वाजता सुरू होईल ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू असेल. यानंतर संध्याकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. तर रात्री याचे निकाल येण्याची शक्यता आहे.

राज्यसभेसाठी खरा मुकाबला उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये पाहायला मिळू शकतो. कारण येथील एका एका जागेसाठी चुरस असणार आहे. उत्तर प्रदेशातील १० जागांसाठी ११ उमेदवार तर कर्नाटकच्या ४ जागांसाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत. हिमाचल प्रदेशातील १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत मात्र येथे काँग्रेसकडे संख्याबळ असल्याने येथे सामना तितका चुरशीचा नसेल.

कुठून कोणते उमेदवार मैदानात?

उत्तर प्रदेश- या राज्यात एकूण ११ उमेदवार आहेत. भाजपकडून सुधांशु त्रिवेदी, आरपीएन सिंह, अमरपाल मौर्या, तेजपाल सिंह, नवीन जैन, साधना सिंह, संगीता बलवंत आणि संजय सेठ आहे. तर समाजवादी पक्षाने जया बच्चन, आलोक रंजन आणि रामजी लाल सुमन यांना मैदानात उतरवले आहे.

कर्नाटक – कर्नाटकात एकूण ५ उमेदवार आहेत. काँग्रेसकडून अजय माकन, सय्यद नासीर हुसेन आणि जीसी चंद्रशेखर मैदानात आहेत. भाजपकडून नारायण सा भांडले तर जेडीएसे कुपेंद्र रेड्डी यांना उतरवले आहे.

हिमाचल प्रदेश – येथे एकूण २ उमेदवार मैदानात आहेत. काँग्रेसने अभिषेक मनु सिंघवी यांना उमेदवार केले आहे तर भाजपकडून हर्ष महाजन रिंगणात आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -