Friday, November 15, 2024
Homeताज्या घडामोडीRaj Thackeray : आपण सगळ्याच दृष्टीकोनातून कात टाकणं गरजेचं आहे

Raj Thackeray : आपण सगळ्याच दृष्टीकोनातून कात टाकणं गरजेचं आहे

मराठी भाषादिनी नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वत्र आज मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din) साजरा केला जात आहे. त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शन सोहळ्याला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळेस त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी अशा मराठीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.

राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत मराठी भाषा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, महाराष्ट्रात साधारणपणे १५ कोटी मराठी लोकसंख्या आहे. दीड-पावणे दोन कोटी बाहेरचे आहेत, बाकी मराठीच आहेत. काही ठराविक नाटकं, चित्रपट सोडले तर प्रेक्षक पाहायला का जात नाहीत? आपण सगळ्याच दृष्टीकोनातून कात टाकणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

राज ठाकरे यांनी पुढे सांगितलं की, ”जी गोष्ट मला टीव्हीवर मोफत पाहता येते, ती पाहण्यासाठी मी पैसे देऊन चित्रपटगृहात जाणार नाही, त्याव्यतिरिक्त काही मिळालं तर जाईन. हिंदी चित्रपटसृष्टी मोठी वाटते, पण तिथेही दणादण चित्रपट आदळत आहेत, कारण लोकांना तोच-तोचपण नको आहे. जे चित्रपट चालले आहेत, ते सहजासहजी टीव्हीवर पाहता येत नाहीत, त्यामुळे ते चालतात. कात टाकणं आवश्यक आहे.”

नवीन कल्पना, नवीन संकल्पना येणं गरजेचं

राज ठाकरे म्हणाले, नवीन संकल्पना, नवीन कल्पना येणं गरजेचं आहे. त्यासाठी माझ्याकडून जो काही हातभार लागेल, त्या-त्या वेळी मी निश्चितपणे आपल्या पाठीमागे उभा आहे. मराठी भाषा दिन साजरा करणं मी आणि माझ्या पक्षाने २००८ मध्ये सुरु केलं, त्याआधी फक्त मराठी भाषा दिवस होता. आता हा दिवस साजरा होतो, मोठा होतो, तो वाढतोय.

मराठी चित्रपटसृष्टीसाठी लवकरच काहीतरी आणणार

मराठी भाषा, मराठी चित्रपट, मराठी जे जे काही आहे, ते वृद्धिंगत व्हावं हीच मनापासून इच्छा आहे. त्यासाठी जे काही माझ्याकडून होईल, ते करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन आणि त्यासाठी मला गृहीत धरलं तरी चालेल. मराठी चित्रपटसृष्टीसाठीही काहीतरी करण्याचा प्रयत्न लवकरच ते समोर येईल.

‘तिकीटालय’ ॲप लाँच

दरम्यान, मराठी भाषा दिनानिमित्त ‘तिकीटालय’ ॲप लाँच करण्यात आलं. मराठी नाटक, चित्रपट आणि कार्यक्रम बुकिंगसाठी तिकिटालय ॲप तयार केलं आहे. इतर ॲपवर मराठी कार्यक्रम कमी असतात. मात्र या ॲपमध्ये सर्व सविस्तर कार्यक्रमाची माहिती आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -