मुंबई: झोप हा आपल्या चांगल्या आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे. आपण कसे झोपतो याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. अनेकदा आपण आपल्या पसंतीच्या अवस्थेत झोपतो. काही लोक पाठीवर तर काही जण पोटावर, काहीजण डाव्या कुशीवर तर काहीजण उजव्या कुशीवर झोपत असतात.
पचनसंस्थेत सुधारणा
डाव्या कुशीवर झोपल्याने गुरुत्वाकर्षण तुमच्या पाचनतंत्राची मदत करतात. यामुळे जेवण अगदी सहज पचते. तसेच अपचनाची समस्या कमी होण्यास मदत होते.
हृदयाचे आरोग्य
आपल्या शरीरात हृदय डाव्या बाजूला असते. डाव्या बाजूला झोपल्याने हृदयावर दाब कमी होतो. यामुळे रक्तसंचार वाढतो. यामुळे हृदयाचे आरोग्य लाभदायक असते.
झोपेची गुणवत्ता सुधारते
अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की डाव्या कुशीवर झोपल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते. खासदरून श्वासासंबंधी समस्या तसेच घोरण्याची समस्या कमी होते.
गर्भावस्थेत लाभदायक
गर्भवती महिलांसाठी डाव्या कुशीवर झोपणे गरजेचे असते. यामुळे रक्तसंचार सुरळीत राहतो आणि गर्भातील बाळाला पोषण पोहोचण्यास मदत होते.