
नेपाल ट्राय नेशन टी-२० आंतरराष्ट्रीय सीरिजअंतर्गत नामिबिया आणि नेपाळ यांच्यात हा टी-२० सामना आज २७ फेब्रुवारीला कीर्तीपूरमधील त्रिभुवन युनिर्व्हसिटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात खेळवण्यात आले. जॉन लॉफ्टी इटनच्या शतकाच्या जोरावर नामिबियाने पहिल्यांदा खेळताना २० षटकांत ४ बाद २०६ धावा केल्या. प्रत्युत्तरात आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या नेपाळच्या संघाला हार पत्करावी लागली. जेव्हा हा रेकॉर्ड लॉफ्टी इटनने तोडला तेव्हा कुशल मल्लाही मैदानात होता. कुशलने २०२३मध्ये आशियाई गेम्समध्ये मंगोलियाविरुद्ध ३४ बॉलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकले होते.A brilliant century by Jan Nicol Loftie-Eaton pushes Namibia's total to 206-4 in 20 overs!🏏#NepT20I | #OneBallBattles | #NepalCricket #HappyDressingRoom | #WorldCupYear2024v pic.twitter.com/TsdvdusGJ7
— CAN (@CricketNep) February 27, 2024