यूपीए सरकारच्या काळातील भ्रष्टाचार आणि घोटाळे जनतेसमोर आणा – गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Share

पेण(देवा पेरवी) – देशातील लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबकी बार चारशे पार अशी घोषणा करत आपल्या पक्षाचे प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. त्याच धर्तीवर आज रायगड लोकसभा मतदार संघातील भाजपचा युथ कार्यकर्ता मेळावा पेण येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी रायगड लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक म्हणुन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात डेव्हलमेंट केली आहे. मात्र मागील दहा वर्षांचा विचार केला तर आत्ताच्या 18 ते 26 या वयोगटातील नव मतदारांना मोदींचे नेतृत्व माहीत आहे. पण यापूर्वी यूपीए सरकारच्या काळातील भ्रष्टाचार किंवा घोटाळ्यांचे कारनामे त्यांना माहीत नसतील तर ते बूथ कमिटीच्या कार्यकर्त्यांनी जनतेसमोर आणावेत असे आवाहन केले.

तर भाजपचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी विद्यमान खासदार सुनिल तटकरे यांना टोला लगावत सांगितले की, आजपर्यत जुन्या कार्यकर्त्यांनी या जिल्ह्यात भाजप जगवली. मात्र आत्ता युतीमध्ये येऊन डायरेक्ट जागेवर हक्क दाखवत असेल तर आम्ही शेती पिकावयाची, आम्ही कापणी, नांगरणी करायची आणि आत्ता आलेले जर शेतावर हक्क दाखवत असतील तर ते आमचे कार्यकर्ते स्वीकारु शकत नाहीत असे सांगितले.

तसेच आमदार रविशेठ पाटील यांनी थेट माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यावर टीका करत ज्या भाजप सरकार सोबत राहून ज्यांनी पाच पाच वेळा खासदार होऊन, केंद्रात मंत्रीपदे भूषवून सत्ता भोगली त्यांचे या रायगडच्या विकासासाठी योगदान काय आहे? रेल्वे, महामार्ग, बाळगंगा प्रकल्प, कारखानदारी यांसारखे किती प्रश्न दिल्ली दरबारी सोडविले असा सवाल केला.

यावेळी व्यासपीठावर रायगड, मावळ आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे केंद्रातील निरिक्षक तथा गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पेण चे विद्यमान आमदार रविशेठ पाटील, दक्षिण रायगड भाजप जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील, केलसेकर, भाजपाचे बाळासाहेब पाटील, महेश मोहिते, विक्रांत पाटील, बाळ माने, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील पेण विधानसभा प्रमुख प्रसाद भोईर, माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि पेण विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी यूवा, महिला मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या.

Recent Posts

लपूनछपून सुरू असलेलं वहिनीचं प्रेम प्रकरण अखेर पेटीतून बाहेर आलं!

आग्रा : उत्तर प्रदेशमधील आग्रामध्ये एक धक्कादायक आणि चटपटीत घटना घडली आहे. एका विवाहितेच्या खोलीतून…

16 minutes ago

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी रेल्वेची विशेष गाडी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…

36 minutes ago

Mumbai Crime : नवरा नाईट शिफ्टवरुन घरी येताच पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह बघून…

मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…

42 minutes ago

Pahalgam Terror Attack : चौघांची ओळख पटली; दोन पाकिस्तानी, दोन स्थानिक

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…

1 hour ago

Abir Gulaal : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘या’ चित्रपटावर बंदीची मागणी

मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…

1 hour ago