Thursday, September 18, 2025

समान काम समान वेतन मागणीसाठी नवी मुंबई पालिकेच्या कंत्राटी कामगारांचा १ मेला मोर्चा

समान काम समान वेतन मागणीसाठी नवी मुंबई पालिकेच्या कंत्राटी कामगारांचा १ मेला मोर्चा

नवी मुंबई :समान काम समान वेतन या मागणीसाठी नवी मुंबई महानगर पालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समाज समता संघटना यांच्या नेतृत्वाखाली गेली ७ दिवसापासून आझाद मैदान येथे सुरू असलेले आंदोलन नंतर आता थेट १मे कामगार दिनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला असल्याचे समाज समता संघटनेचे मंगेश लाड यांनी सांगितले.

नवी मुंबई महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन मिळावे या मागणीसाठी समाज समता संघटनेतर्फे आझाद मैदानात येथे आंदोलन करण्यात आले होते.

यावेळी नगर विकास विभाग सचिवा सोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा न निघाल्यामुळे अखेर येथे एक मे कामगार दिन रोजी मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानावर मोर्चा नेणार असल्याचे मंगेश लाड यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा