दिग्गज आयटी कंपनीच्या सीईओंच्या सल्ल्याने आयटी तज्ज्ञांसह कर्मचा-यांची उडाली झोप!

कॉम्प्युटर लँग्वेज-कोडिंग सोडा, आता बायोलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग किंवा शेती करा


नवी दिल्ली : जगातील दिग्गज टेक कंपन्यांपैकी एक असणाऱ्या Nvidia चे सीईओ जेनसेन हुआंग (Jensen Huang) यांच्या एका वक्तव्याने आयटी क्षेत्रात खळबळ उडाली असून आयटी तज्ज्ञांसह कर्मचा-यांची देखिल अक्षरश: झोप उडाली आहे.

एकीकडे अन्य कंपन्यांचे सीईओ तरुणांना कॉम्प्युटर लँग्वेज आणि कोडिंग शिकण्याचा सल्ला देत असतात. मात्र हुआंग यांनी याच्या अगदी उलट सल्ला दिला आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज आणि कोडिंग शिकण्याऐवजी आपण बायोलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग किंवा शेती अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवे, असा सल्ला त्यांनी नवतरुणांना दिला आहे.





हुआंग हे दुबईमधील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी एआयमुळे आपल्या जगावर किती प्रभाव पडला आहे याबाबत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, की आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) हा अगदी सुरुवातीचा काळ आहे. मात्र आताच एआय एवढे प्रगत झाले आहे की ते कोडिंग देखिल करु लागले आहे. त्यामुळे तरुणांनी प्रोग्रामिंग लँग्वेज (Programing Language) शिकण्यावर वेळ वाया घालवण्याची आता गरजच उरलेली नाही.


"गेल्या १० ते १५ वर्षांपासून टेक फील्डमधील प्रत्येक उच्चपदस्थ व्यक्ती तरुणांना कॉम्प्युटर सायन्स (Computer Science) आणि प्रोग्रामिंग शिकण्यास सांगत आहेत. खरेतर परिस्थिती अगदी त्याच्या उलट आहे. कारण तंत्रज्ञान आता इतके पुढे गेले आहे की, कोणालाही प्रोग्रामिंग करण्याची गरज नसेल. एआयमुळे आज जगातील प्रत्येक व्यक्ती प्रोग्रामर झाला आहे", असे ते म्हणाले.


हुआंग पुढे म्हणाले, "तरुणांनी आता अधिक उपयोगी असणाऱ्या कौशल्यांना विकसित करण्याकडे भर द्यावा. बायोलॉजी, शिक्षण, मॅन्युफॅक्चरिंग, फार्मिंग आणि अशा क्षेत्रांकडे तरुण लक्ष देऊ शकतात. कॉम्प्युटर प्रोग्रामिंग आता आपोआप होत आहे, त्यामुळे लोकांना केवळ आपल्या नेहमीच्या भाषांचीच गरज आहे."

Comments
Add Comment

अमेरिकेच्या लढाऊ विमानांना जागा देण्यास श्रीलंकेचा नकार

कोलंबो : मध्य पूर्वेतील युद्धामुळे स्ट्रेट होर्मुझवरील तेल वाहतुकीला फटका बसला आहे. होर्मुझ मार्ग सुरळीत

‘दहशतवादाचा नकाशा बदलला’; जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान जगात अव्वल

- जीटीआय अहवालातून समोर आले धक्कादायक आकडे जागतिक दहशतवादाच्या चित्रात मोठा बदल होत असून पाकिस्तान आता जगातील

Iran-US-Israel War : इराणने अमेरिकेच्या F-35 लढाऊ विमानाला केले लक्ष्य

- इस्रायली तेल शुद्धीकरण कारखान्यावर मोठा हल्ला पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर

Iran-US-Israel War : “इराणची लष्करी ताकद उद्ध्वस्त, युद्धात इस्रायलच आघाडीवर!” – नेतन्याहू यांचा मोठा दावा

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाबाबत मोठे दावे केले आहेत. त्यांनी

Iran-US-Israel War : अमेरिकी सैन्य इराणवर चालून जाणार ? ट्रम्प यांच्या वक्तव्यांमुळे वाढला गोंधळ

- आमच्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य; आम्ही जिथे हवं तिथे कारवाई करू -डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा अमेरिकेचे

गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण,