मुंबई: फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. हा आठवडा २६ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२४असा असणार आहे. ज्योतिषतज्ञांचे म्हणणे आहे हा नवा आठवडा पाच राशींच्या लोकांसाठी शुभ गोष्टी घेऊन येणारा आहे.
मेष – कामाच्या ठिकाणी भाग्याची पूर्ण साथ लाभेल. यामुळे हाती घेतलेली कामे यशस्वी होतील. व्यापार करणाऱ्यांना खूप ऑर्डर मिळाल्याने धनलाभ होईल.
कर्क – मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीपेशा लोकांचे इनकमचे आणखी स्त्रोत बनतील. बँक बॅलन्स वाढेल. दाम्पत्य जीवनात मधुरता येईल.
सिंह – तुमच्या घरी खूप आनंद येईल. व्यवसायास मनजोगती प्रगती होईल. नोकरीच्या बाबतीत तुम्ही खूप व्यवहारिक असाल. प्रमोशन मिळू शकते.
कुंभ – दीर्घकाळापासून जे नोकरीच्या प्रतीक्षेत होते त्यांना नोकरी मिळू शकते. कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे.
मीन – कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास आणि आत्मबळाने कोणताही कौटुंबिक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात सक्षम व्हाल. व्यापारात फायदा होईल. खर्च कमी होईल.