Monday, August 25, 2025

येथे FDवर मिळत आहे ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याजदर

येथे FDवर मिळत आहे ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याजदर

मुंबई: वरिष्ठ नागरिकांसाठी त्यांनी साठवलेले पैसेच ही त्यांची सगळ्यात मोठी पुंजी असते. यासाठी ते गुंतवणुकीचे विविध पर्याय शोधत असतात जिथे त्यांना गॅरंटेड आणि चांगले रिटर्न मिळतील. अधिकतर वरिष्ठ नागरिकांसाठी फिक्स डिपॉझिट म्हणजेच FD हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय असतो. सरकारी आणि खाजगी बँकांच्या तुलनेत स्मॉल फायनान्स बँक एफडीवर सर्वाधिक व्याजदर देत असतात. काही बँका तर वरिष्ठ नागरिकांसाठी ९ टक्क्याहून अधिक व्याजदर देत आहेत.

Equitas Small Finance Bank

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक सामान्य ग्राहकांसाठी ७ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीसाठी ४ टक्के ते ९ टक्क्यांपर्यंत एफडीवर व्याजदर देत आहे. ४४४ दिवसांनी मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ९ टक्के सर्वाधिक व्याजदर मिळत आहे. तर वरिष्ठ नागरिकांसाठी सामान्य नागरिकांच्या तुलनेने दिला जाणारा व्याजदर ०.५० टक्के अधिक आहे. हे दर २१ ऑगस्ट २०२३ पासून लागू आहेत.

Fincare Small Finance Bank

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक वरिष्ठ नागरिकांना ७ दिवस ते १० वर्षाच्या कालावधीत ३.६० टक्के ते ९.२१ टक्क्यांपर्यंत एफडीवर व्याजदर देत आहे. ७५० दिवसांनी मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ९.२१ टक्के व्याजदर दिले जात आहे.

Jana Small Finance Bank

जना स्मॉल फायनान्स बँक वरिष्ठ नागरिकांसाठी ७ दिवस ते १० वर्षादरम्यान कालावधीसाठी ३.५० टक्के ते ९ टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. ३६५ दिवसांनी मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ९ टक्के सर्वाधिक व्याजदर मिळत आहे.

Comments
Add Comment