नवी मुंबई – नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील दिघा-इलठण पाडा येथे एका तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. हरी ओम मोर्य वय(२४ वर्षे) असे या तरूणाचे नाव आहे. हरी ओम मोर्य ऐरोली येथे राहणारा होता.
पालिकेच्या हद्दीतील दिघा – इलठण पाडा येथे रेल्वेचा डॅममध्ये हरी ओम मोर्य आपल्या मित्रांसोबत दुपारच्या सुमारास पोहण्यासाठी आला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
सदर घटने संदर्भात नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली येथील अग्निशमन केंद्राला माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या हरी ओम मोर्य यांचा शोध घेत त्याचा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.