Wednesday, July 24, 2024
Homeराशिभविष्यWeekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, २५ फेब्रुवारी ते २ मार्च २०२४

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, २५ फेब्रुवारी ते २ मार्च २०२४

साप्ताहिक राशिभविष्य, २५ फेब्रुवारी ते २ मार्च २०२४

समस्या संपुष्टात येतील
मेष :
महत्त्वाची कामे पूर्ण करता आल्यामुळे आपल्याला या आठवड्यामध्ये दिलासा मिळेल. अडचणी, समस्या संपुष्टात येतील. कुटुंबातील असलेले वाद-विवाद शमतील. विशेषतः वडिलोपार्जित मालमत्ताविषयी असलेले मतभेद संपून सर्वानुमते तोडगा निघेल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचा याकामी सहभाग असेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये समन्वय राहील. एखादे शुभ कार्य ठरू शकते. कुटुंब-परिवारातील विद्यार्थ्यांकडून सुखकारक वार्ता कानी येऊन त्यांचे उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. व्यवसाय-नोकरी-धंदा या क्षेत्रात अपेक्षित प्रगती होईल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वेतनवृद्धी, पदोन्नतीसारख्या घटना घडतील; परंतु काही वेळेस शत्रूंचा त्रास वाढून मनस्ताप होऊ शकतो.
निराशा आणि नकारात्मकता दूर होईल
वृषभ :
आपल्या कार्यक्षेत्रात व कुटुंबात काही शुभ घटना घटित झाल्यामुळे निराशा आणि नकारात्मकता दूर होईल. सुख स्वास्थ्याचा लाभ मिळेल. आंतरिक समाधान मिळेल. मनाला आनंद आणि उत्साह वाढवणाऱ्या वार्ता मिळतील. सकारात्मकतेमध्ये वृद्धी जरी झाली असेल तरी आपल्याला आपले प्रयत्न अविरत चालू ठेवून कार्यमग्न राहिले पाहिजे. आपल्या मनासारखे अपेक्षित यश मिळू शकते. कुटुंब परिवारातील वातावरण स्थिर राहील; परंतु काही वेळेस दाम्पत्य जीवनात ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाद-विवाद टाळा. विद्यार्थ्यांनी कुसंगती टाळणे महत्त्वाचे ठरेल. प्रेम प्रसंगात जरा जपूनच पावले उचलावी लागतील. गैरसमजुतीने संबंध बिघडण्याची शक्यता. नोकरीमध्ये अनुकूलता लाभून अपेक्षापूर्ती होईल. उत्पन्न वाढेल.
संकटे परस्पर जातील
मिथुन :
आपल्या रोजच्या जीवनात बदल घडल्याचे अनुभवण्यास मिळेल. अनुकूल ग्रहमान संरक्षक कवच उभारेल. परमेश्वराचा आशीर्वाद लाभल्याने येणारी संकटे परस्पर जातील; परंतु आपण आपल्या वर्तणुकीवर, बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कोणाचाही अपमान करू नका. काही वेळेस मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याबरोबर मतभेद संभवतात. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्यामुळे आत्मीक समाधान वाटून कृतकृत्य व्हाल. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होतील. मनासारखा जोडीदार निवडता येईल. काहींना अनपेक्षित विवाहयोग तसेच परिचयोत्तर विवाह ठरतील. नोकरी-व्यवसायात काही वेळेस स्पर्धक बलवान होऊ शकतात. स्वतंत्र व्यवसायिकांना धनलाभ होतील.
आर्थिक फायदा
कर्क :
आपल्यासमोरील कामे पूर्ण होत असल्याचा अनुभव आला. महत्त्वाची कार्य पार पडतील. जमीन-जुमला, स्थायी-संपत्ती, मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार रेंगाळलेले होते, असे व्यवहार गतिमान होतील. ओळखी-मध्यस्थी यशस्वी होऊन आर्थिक फायदा संभवतो. वडिलोपार्जित संपत्तीसंबंधीच्या वाटाघाटी यशस्वी होतील. वास्तुविषयक व्यवहारात प्रगती आणि लाभ होईल. आपण जोपासलेल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. मात्र प्रयत्नात खंड पडू देऊ नका. परिवाराचे सहकार्य अपेक्षेनुसार मिळत राहील. विशेषत: भावंडे व पती-पत्नीचे सहकार्य मिळेल. त्याचप्रमाणे स्वतंत्र जागेत आपला व्यवसाय सुरू करण्यात यश मिळेल. व्यवसायासाठी काही बदल करावे लागतील.
नवीन उत्तम संधी चालून येतील
सिंह :
या आठवड्यात बदलत्या ग्रहमानानुसार आपल्याला शुभ ग्रहांचे पाठबळ लाभणार आहे. रोजच्या जीवनात शुभ योगाची साथ-संगत लाभेल. विद्यार्थी शैक्षणिक प्रगतिपथावर असतील. त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल. परदेशगमनाची शक्यता. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उत्तम पर्व सुरू होऊ शकते. मात्र कुसंगतीतून त्रास व मनस्ताप संभवतो. नोकरी- व्यवसायात नवीन उत्तम संधी चालून येतील, त्यांचे सोने करणे आपल्याच हाती आहे हे लक्षात ठेवा. कुटुंब- परिवारातून तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळातून शुभवार्ता मिळतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.
भाग्योदय होईल
कन्या :
या सप्ताहात आपल्या प्रगतीचा आलेख उंचावणारा आहे. आपल्यासमोरील कार्य थोड्या प्रयत्नांनी पूर्ण होतील. विशेषतः दीर्घकाळ रेंगाळलेली कार्य पूर्ण करण्यात यश मिळेल. विशेषतः जमिनी, स्थायी संपत्तीविषयीची कामे गतिमान होतील. मात्र काही विचित्र घटना घटित झाल्यामुळे धावपळ करावी लागेल. तसेच लहान-मोठ्या आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगणे हिताचे ठरेल. राहत्या घराविषयीचे प्रश्न असल्यास ते सुटतील. पती अथवा पत्नीचा भाग्योदय होईल. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकतील. कुटुंबातील तरुण-तरुणींचे विवाह ठरतील.
अपेक्षित लाभ मिळतील
तूळ
:
आपली कर्तबगारी व बुद्धिकौशल्याने आपली कामे आपण करून घेणार आहात. प्रलंबित कार्य पूर्ण करताना त्यामध्ये राजकारणामुळे अथवा आपल्या शत्रूंच्या कारवायांमुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्या दूर करू शकाल. काही वेळेस शुभ योगांच्या माध्यमातून अपेक्षित लाभ मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीसंबंधित रेंगाळलेली कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आलेली दिसतील. कुटुंबातील वातावरण मिश्र स्वरूपाचे राहू शकते. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मतास प्राधान्य देऊन वाद-विवाद टाळल्यास त्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. चालू नोकरी सोडून चांगली नोकरी शोधता येईल. प्रयत्नांना यश संभवते. नवीन करारमदारामुळे फायद्याचे सौदे होतील.
प्रश्न सुटतील

वृश्चिक : अनपेक्षितरीत्या सकारात्मक घटना घटित होऊन अनुकूलतेमध्ये वाढ झाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. विशेषतः कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. नोकरीविषयक समस्या संपुष्टात येतील; परंतु त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. इतर कोणावरही विसंबून राहू नका. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. इतरत्र वेळ घालवणे महागात पडू शकते. उच्च शिक्षण घेता येईल. त्यासाठी लागणारे सहकार्य कुटुंबातून तसेच गुरूकडून मिळू शकते. नोकरीमध्ये वातावरण सर्वसामान्य राहील. इतरांच्या मतास प्राधान्य देणे हिताचे ठरेल. वादविवाद टाळा.

प्रेमामध्ये यश
धनु : या आठवड्यात आपल्याला उत्तमोत्तम संधी प्राप्त होतील. मात्र त्याचे सोने करणे आपल्या प्रयत्नांवर अवलंबून राहील. स्वतःच्या मालकीच्या घरात गृहप्रवेश करता येईल. ओळखी तसेच मध्यस्थींद्वारे मार्गदर्शन मिळेल. वडिलोपार्जित मालमत्ता संपत्तीविषयक असलेले मतभेद संपुष्टात येऊन तोडगा निघेल. नोकरीत स्वास्थ्य व समाधान लाभेल. आपण केलेल्या कामाचे फळ मिळेल. परदेशगमनाची संधी मिळू शकते तसेच विशेष कार्यासाठी निवड होऊ शकते. प्रेमामध्ये यश प्राप्त करू शकाल. रोजच्या जीवनात बदल घडेल. नवीन ऋणानुबंध जुळतील.
नोकरी मिळेल
मकर :
कुटुंब-परिवारात सतत सुवार्तांचा ओघ राहिल्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. कुटुंबातील सर्व सदस्यांचे अपेक्षित सहकार्य मिळत राहून समन्वय वाढेल. मात्र वैवाहिक जीवनात वादविवाद टाळणे हिताचे ठरेल. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होतील. विवाह योग. कुटुंब परिवारातील मुला-मुलींविषयी त्यांच्या प्रगतीपर वार्ता कानी येतील. नोकरीविषयक प्रश्न संपुष्टात येतील. नोकरी मिळेल. चालू नोकरीत प्रगती करू शकाल; परंतु आपल्या कामात अद्ययावत राहा. वरिष्ठांबरोबर मतभेद टाळा व्यावसायिक जुने संबंध नव्याने प्रस्थापित होण्याची शक्यता. व्यवसायिक आर्थिक गरज पूर्ण होईल. व्यवसाय धंद्यातील वादग्रस्त येणी येतील.


यश आणि प्रसिद्धी
कुंभ :
प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली कार्य पूर्ण करता येतील. विशेषतः सरकारी स्वरूपाची कामे ओळखी-मध्यस्थीतून पूर्ण होतील. त्यासाठी अपेक्षित असलेले सहकार्य इतरांकडून मिळेल; परंतु त्यासाठी खर्च करावा लागेल व वेळही द्यावा लागेल. तरुण-तरुणींच्या समस्यांचे निराकरण होईल. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. कुटुंब-परिवारात मंगल कार्याचे योग आहेत. साहित्य क्षेत्र तसेच कला विश्वातील जातकांचा मानसन्मान वाढून त्यांना यश आणि प्रसिद्धी मिळेल. येतील समाजातील मान्यवरांचे सहकार्य मिळेल. स्वतःच्या वास्तूचे स्वप्न साकार होईल. नोकरीत आशादायक वातावरण तयार होऊन पदोन्नती, वेतनवृद्धी मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल.
कृतिशील पाठिंबा

मीन : सदर कालावधी प्रगतिकारक असणार आहे. कुटुंब-परिवारातील वातावरण सुखद राहील. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या सहकार्यामुळे समस्यांवर मात करू शकाल. ज्येष्ठ व्यक्तींचा कृतिशील पाठिंबा मिळवण्यात यश मिळेल. परिवारात धार्मिक व मंगलकार्य घटित होतील. घरातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचा विवाह ठरण्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होऊन विवाह निश्चित होतील. त्याकामी आप्तेष्ट व नातेवाइकांचे सहाय्य लाभेल. अचानक पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. मात्र या सगळ्या धावपळीमध्ये वाद – विवाद टाळणे महत्त्वाचे राहील. मानपानाचे नाट्यरंग होऊ शकते. तरुण-तरुणींना आपला मनपसंत जीवनसाथी निवडता येईल. काहींचे परिचयोत्तर विवाह ठरतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -