Thursday, July 25, 2024
Homeक्राईमPune drugs news : पुण्याच्या संस्कृतीचं वाटोळं केलंय! पुण्याची तरुणाई नशेत तर्रर्र...

Pune drugs news : पुण्याच्या संस्कृतीचं वाटोळं केलंय! पुण्याची तरुणाई नशेत तर्रर्र…

अभिनेते रमेश परदेशी यांनी समोर आणला हादरवणारा व्हिडिओ

पुणे : पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Pune crime news) वाढ झाली आहे, त्याचबरोबर ड्रग्जच्या केसेसही (Drugs cases) सापडत आहे. मागच्याच काही दिवसांत पुण्यात चार हजार कोटींचं ड्रग्ज सापडलं होतं, तसंच ड्रग्जमाफिया ललित पाटील (Lalit Patil) याला देखील पकडण्यात आलं होतं. त्यानंतर पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिनेते रमेश परदेशी (Ramesh Pardeshi) यांनी या घटनेचा व्हिडीओ सर्वांसमोर आणला आहे. या व्हिडीओमध्ये नशेत तर्रर्र झालेल्या तरुण मुली दिसत आहेत, ज्यांना धड उभंही राहता येत नाही आहे. यामुळे देशाच्या तरुणांच्या भवितव्यावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

अभिनेते रमेश परदेशी हे पुण्याच्या वेताळ टेकडीवर व्यायामासाठी गेले असता टेकडीच्या एका कोपऱ्यात दोन तरुण मुली नशा करुन बेशुद्ध पडलेल्या दिसल्या. त्यातील एक मुलगी नशेत काहीतरी बडबडत होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ चित्रित करुन त्यांनी सोशल मिडियावर (Social media) पोस्ट केला आहे. या ते म्हणातायत की, वेताळ टेकडीवर आम्ही पळायला आलो होतो. तर इथं महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या या दोन तरुणी बियर, दारु आणि नशेचं काहीतरी घेऊन टेकडीच्या कोपऱ्यात पडल्या होत्या. या तरुणींना आम्ही इथं सेफ जागी घेऊन आलो. हे यासाठी सांगतोय कारण पुण्यात दोन दिवसांपूर्वी ४ हजार कोटींचं ड्रग्ज सापडलं आहे.

याच व्हिडीओत ते म्हणतात की, शिक्षणाचं आणि संस्कृतीचं माहेरघर असलेलं पुणे शहर हे आता नशेचं माहेरघरं होतंय का? याचा आपण सर्वांनी गंभीरपणे विचार करायला हवा. पुण्यातील टेकड्यांवर लोक आपलं शरीर सांभाळण्यासाठी येतात तिथं ही तरुण मुलं मुली अशा प्रकारे नशा करतात. आपल्या आई-वडिलांना माहिती नसतं की मुलं नक्की काय करतात बाहेर. अभ्यास करण्यासाठी आलेल्या मुलांचे इथे हे प्रकार चालतात आणि हा अत्यंत गंभीर विषय आहे.

पुणेकर ड्रग्सवर शांत का?

या व्हिडीओत बोलताना त्यांनी पालकांवरदेखील काही प्रमाणात आरोप केले आहेत. शिवाय हे प्रकरणं गांभीर्यानं घेण्याचं आवाहनही त्यांनी पालकांना केलं आहे. आपण एक पालक, सजग नागरिक, भाऊ, बहिण म्हणून आपण याकडं गांभीर्यानं बघणार आहोत की नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात ४ हजार कोटी ड्रग्ज सापडलं पण पुणेकरांनी यावर साधी एक प्रतिक्रिया दिलेली नाही. मागे ललित पाटील सापडला आणि आता हे. त्याचा केवळ राजकारणासाठीच वापर झाला. पण यामुळं तरुण पिढी बरबाद होत आहे याचा आपण गांभीर्यानं विचार करणार आहोत का नाही? जर आत्ताच काही केलं नाहीतर पुण्याचा उडता पंजाब व्हायला वेळ लागणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

या व्हिडीओमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -