आई आणि मुलीचे नाते हे नेहमीच खास असते. कधी त्या मैत्रिणी असतात, तर कधी त्यांच्यात रुसवे-फुगवेही असतात. कधी मुलगी आई बनून आईला साथ देते. तर कधी आई कठीण प्रसंगी मुलीच्या मागे खंबीरपणे उभी राहते. या नात्यातील अशीच अनोखी गंमत ‘मायलेक’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘मायलेक’ आगळ्या-वेगळ्या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या १९ एप्रिल रोजी मायलेकीची ही गोड कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आई – मुलीच्या सुंदर नात्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. यात प्रेमासोबत काही आंबट-गोड क्षणही आहेत. प्रत्येक आई मुलीला हा चित्रपट जवळचा वाटेल. मुळात चित्रपटात खऱ्या मायलेकी असल्याने हे पडद्यावरही खूप नैसर्गिकरीत्या भूमिका साकारता आल्याचे निर्माती सोनाली खरे यांनी स्पष्ट केले. हा विषय खूप संवेदनशील आहे. विशेषतः मुली जेव्हा वयात येतात. त्यावेळी आई आणि मुलीचे नाते खूपच नाजूक वळणावर असते. यात एकतर मुलगी आणि आई मैत्रिणी तरी होतात किंवा मग त्यांच्यात नकळत दुरावा तरी निर्माण होतो. मग अशा वेळी दोघीनींही एकमेकींना समजून घेणे गरजेचे आहे. हा विषय जरी नाजूक असला तरी खूप हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आहेत प्रियांका तन्वर. तर या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने, महेश पटवर्धन, वंश अग्रवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रत्यक्षात मायलेक असणाऱ्या दोघी त्याच भूमिकेत एकत्र पाहायला मिळणार आहेत. कल्पिता खरे, बिजय आनंद हे या चित्रपटाचे निर्माते असून नितीन प्रकाश वैद्य असोसिएट प्रोड्यूसर आहेत. पोस्टरमध्ये सोनाली खरे आणि सनाया आनंद यांच्या नात्यातील सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता यांचे नाते कसे असणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ ही गोष्ट आपणा सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र ‘अलीबाबा आणि ‘चाळिशी’तले चोर’ ऐकून जरा नवलच वाटले असेल. तर हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या २९ मार्चला चित्रपटगृहात हे चाळिशीतले चोर दाखल होणार आहेत. चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीतील अनेक मातब्बर कलाकार एकत्र येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे एक कमाल पॅकेज असणार आहे. नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृदगंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित ‘अलीबाबा आणि ‘चाळिशी’तले चोर’चे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केले असून त्यात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे अशी तगडी स्टारकास्ट आहेत. या चित्रपटाचे लेखन विवेक बेळे यांनी केले असून नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे हे निर्माते आहेत. चित्रपटाचे नावच प्रचंड उत्सुकता वाढवणारे आहे. विवाहित असण्याचा गुन्हा चित्रपटातील या चाळिशीतील चोरांनी केला आहे. आता या गुन्ह्याची त्यांना काय शिक्षा मिळणार? विवाहित असणे का गुन्हा आहे आणि हे नेमके काय प्रकरण आहे, याचे उत्तर आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. मल्टिस्टारर असलेला हा चित्रपट विनोदी आहे. सगळेच कलाकार मातब्बर असल्याने प्रत्येकाच्या वेगवेगळ्या छटा या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. एकंदरच चित्रपटाच्या पहिल्या लूकवरून चोरांची ही टोळी दंगा करणार, हे निश्चित!
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…
डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…
CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…
मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे (Pehalgam Terror Attack) जगभरात एकच खळबळ…
पटना : बिहारमधील एका नीटची (NEET) परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक…