Friday, July 11, 2025

Manoj Jarange Patil : माझा बळी घ्यायचा असेल तर सागर बंगल्यावर येतो! मनोज जरांगेंची देवेंद्र फडणवीसांना धमकी

Manoj Jarange Patil : माझा बळी घ्यायचा असेल तर सागर बंगल्यावर येतो! मनोज जरांगेंची देवेंद्र फडणवीसांना धमकी

जरांगे उठून निघाले आणि सागर बंगल्याकडे जाताना रस्त्यात भोवळ येऊन पडले...


मनोज जरांगे आक्रमक; मराठा बांधवांचंही ऐकेनात!


जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) समाधानी नसून आज त्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आज त्यांनी गंभीर आरोप केले. 'मी आता सागर बंगल्यावर येतो. तुम्ही माझा बळी घ्या, पण खोटे आरोप करू नका', असं म्हणत मनोज जरांगे उठून जाऊ लागले त्यावेळी जमलेल्या मराठा समाजाने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शांत होत नव्हते आणि एकच गोंधळ उडाला.


मनोज जरांगे यांनी आजच्या बैठकीत फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मराठा समाजाला ओबीसमधून आरक्षण मिळू नयेत यासाठी फडणवीस यांच्याकडून षडयंत्र सुरु आहे. त्यांच्याकडून मला फसवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. माझा बळी घायचा असेल तर मी स्वतःच फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जातो. फडणवीस यांना आयुष्यातून उठवून टाकील असंही जरांगे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे व्यासपीठावरून उठून जरांगे थेट मुंबईच्या दिशेने निघाले, मात्र मध्येच त्यांना भोवळ आली.


मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे यांना भोवळ आल्याने काही अंतरावर ते थांबले. गावकऱ्यांनी त्यांना रुमालने हवा देण्याचा प्रयत्न केला. तसेच तुमची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे तुम्ही पायी चालू नका अशी विनंती गावकरी करत आहेत. सध्या आंतरवालीत मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरु आहे.



देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी या प्रकारावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. जरांगे काय बोलले ते मी ऐकलं नाही, असं ते म्हणाले.



भाजपा आमदार नितेश राणे यांचा जरांगेंना इशारा


'सागर बंगल्यावर येण्याआधी मध्ये एक मोठी भिंत आहे. ती पार करावी लागेल. आणि ती भिंत आम्ही आहोत', असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मनोज जरांगेंना दिला आहे. "आमच्या सरकारनं १० टक्के आरक्षण दिलं असून, मराठा समाजानं ते स्वीकारलं आहे. जरांगे-पाटलांचं समाधान होत नसल्यानं ते फडणवीसांवर टीका करत आहेत. तर आम्ही मराठेही येथे उभे आहोत," असं नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment