Thursday, July 18, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणKonkan Shimgotsav : चाकरमान्यांका शिमग्याची खुशखबर! कशेडी घाटातील बोगद्याचा एकेरी मार्ग खुला

Konkan Shimgotsav : चाकरमान्यांका शिमग्याची खुशखबर! कशेडी घाटातील बोगद्याचा एकेरी मार्ग खुला

मुंबई : कोकणातील (Konkan) माणसं नोकरीच्या निमित्ताने मुंबईत राहत असली तरी सणासुदीच्या वेळी त्यांची पावलं आपोआप कोकणातील घराकडे वळतात. त्यातील गणपती (Ganpati) आणि शिमग्याच्या (Shimgotsav) वेळी तर हमखास चाकरमानी कोकणात दाखल झालेले पाहायला मिळतात. यावेळेस गाड्यांना गर्दीही फार असते. मात्र, यावेळी चाकरमान्यांसाठी एक खुशखबर आहे. कोकणात जाताना लागणाऱ्या कशेडी घाटातील बोगद्याचा (Kashedi tunnel) एकेरी मार्ग खुला करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे.

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील खेडमधील कशेडी घाटातील बोगद्याचा कोकणात येण्यासाठीचा एकेरी मार्ग कालपासून सुरू करण्यात आला आहे. सद्यस्थितीत मुंबईकडे जाण्यासाठी कशेडी घाटाचाच वापर करावा लागत असला तरी, दुसऱ्या बोगद्यातील कामही अंतिम टप्प्यात आले असल्याने मार्चपर्यंत तो बोगदाही सुरू केला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिलेल्या या खुशखबरीमुळे शिमगोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दुतर्फा वाहतुकीसाठी बोगदा मार्च अखेरपर्यंत सुरु होणार

कशेडी बोगदा दुतर्फा वाहतुकीसाठी मार्च महिन्याच्या अखेरपर्यत खुला होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून प्रलंबित कामांना गती देण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील गणेशोत्सवात सुरू झालेल्या एकेरी मार्गिकेच्या वाहतुकीला अवघ्या १८ दिवसानंतर लागलेला ब्रेक आज मितीसही कायम असून बोगदा खुला होण्याची वाहन चालकांना प्रतीक्षा लागली आहे. मार्च अखेरपर्यंत बोगद्यातील दुतर्फा वाहतूक खुली होण्याचे संकेत मिळत आहेत.

चार वर्षांची प्रतीक्षा संपणार!

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते २०१९ साली कंपनीने या बोगद्याच्या कामाला सुरुवात केली. जवळपास चार वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर आता बोगद्याचे काम आता पूर्णत्वास येत आहे. मागील काही वर्ष मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यातच डिसेंबर २०२४ ही चौपदरीकरण पूर्ण करण्याची डेडलाईन असून कंपनी ठेकेदार आणि संबंधित प्रशासन दिवस रात्र काम करून या मार्गावरील चौपदरीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -