'बाबा म्हणतात' कविता आणि काव्यकोडी


  • कविता : एकनाथ आव्हाड 


बाबा म्हणतात...


बाबा म्हणतात, क्रियापदावरून
समजतो उद्देश-हेतू
क्रियापदाचे अर्थ यातून
बाळा जाणून घे तू...

इकडे या, तिकडे जा
बचत करा, बचत करा
क्रियापदाचा अर्थ यातला
अज्ञार्थीच आहे खरा...

जर वाचाल, तर वाचाल
जो करेल, तो भरेल
क्रियापदावरून संकेतार्थ
यातून बघ तुला कळेल...

वाऱ्याची गार झुळुक यावी
वडीलधाऱ्यांचा मान राखावा
क्रियापदावरून विद्यार्थाचा
अर्थ यातून समजावा...

मुले-बाळे मनमुराद हसली
गुरे-वासरे ओलीचिंब झाली
क्रियापदावरून स्वार्थाची
अर्थच्छटा कळून आली...

बाबांच्या बोलण्यातून मला वाक्याचा उद्देश कळतो
क्रियापदाचा अर्थ त्यातून
अचूक ओळखून घेतो...

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड


१) भारतीय गाणकोकिळा
क्वीन ऑफ मेलडी
छत्तीसपेक्षा जास्त भाषांमध्ये
गाणी त्यांनी गायिली...

दादासाहेब फाळके, भारतरत्न
पुरस्काराने गौरविले
आनंदघन नावाने
कोण संगीतकारही झाले?

२) पहिले भारतीय वैमानिक
त्यांनाच मानले जाते
भारतीय विज्ञान वाहतूक
उद्योगाचे जनकच ते...

टाटा समाज विज्ञानसंस्था
त्यांनीच केली स्थापन
भारतरत्न पुरस्काराचे
सांगा मानकरी कोण?

३) भारतीय कायदेपंडित
धर्मशास्त्राचे अभ्यासक
भारतरत्न पुरस्कारासह
सन्मान लाभले कैक...

‘धर्मशास्त्राचा पंचखंडात्मक
इतिहास’ ग्रंथ रचिला
महामहोपाध्याय या पदवीचा
मान कोणास मिळाला?
उत्तरे : 

१) लता मंगेशकर

२) जे. आर. डी. टाटा 

३) पांडुरंग वामन काणे 
Comments
Add Comment

विवेक

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ डेस्टिनेशन वेडिंग’साठी आम्ही जयपूरला गेलो होतो. तिथे एका लग्न समारंभात आम्ही

जीवनगाणे - अर्थपूर्ण जगण्याचा सुरेल प्रवास

गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर जीवन हे एका सुंदर गाण्यासारखे असते. प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळे सूर, ताल,

पुस्तक चोरी

कथा : रमेश तांबे सकाळी ११ वाजता शाळा भरली आणि शाळेत एकच बोंब झाली. चोरी झाली, चोरी झाली. चोरीची ही वार्ता साऱ्या

सहलीचे फायदे

कथा : प्रा. देवबा पाटील शिवपूर गावाजवळच एक पौराणिक संदर्भ असलेले वेदपूर नावाचे छोटेसे सुप्रख्यात तीर्थक्षेत्र

समस्या...?

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ सोशल मीडियावर एक बातमी वाचली. त्या बातमीतील घटना खूप अस्वस्थ करून गेली. त्या

स्वयंप्रतिमा

गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मनुष्याच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे