Saturday, November 1, 2025
Happy Diwali

'बाबा म्हणतात' कविता आणि काव्यकोडी

'बाबा म्हणतात' कविता आणि काव्यकोडी
  • कविता : एकनाथ आव्हाड 

बाबा म्हणतात...

बाबा म्हणतात, क्रियापदावरून समजतो उद्देश-हेतू क्रियापदाचे अर्थ यातून बाळा जाणून घे तू... इकडे या, तिकडे जा बचत करा, बचत करा क्रियापदाचा अर्थ यातला अज्ञार्थीच आहे खरा... जर वाचाल, तर वाचाल जो करेल, तो भरेल क्रियापदावरून संकेतार्थ यातून बघ तुला कळेल... वाऱ्याची गार झुळुक यावी वडीलधाऱ्यांचा मान राखावा क्रियापदावरून विद्यार्थाचा अर्थ यातून समजावा... मुले-बाळे मनमुराद हसली गुरे-वासरे ओलीचिंब झाली क्रियापदावरून स्वार्थाची अर्थच्छटा कळून आली... बाबांच्या बोलण्यातून मला वाक्याचा उद्देश कळतो क्रियापदाचा अर्थ त्यातून अचूक ओळखून घेतो...

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड

१) भारतीय गाणकोकिळा क्वीन ऑफ मेलडी छत्तीसपेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी त्यांनी गायिली... दादासाहेब फाळके, भारतरत्न पुरस्काराने गौरविले आनंदघन नावाने कोण संगीतकारही झाले? २) पहिले भारतीय वैमानिक त्यांनाच मानले जाते भारतीय विज्ञान वाहतूक उद्योगाचे जनकच ते... टाटा समाज विज्ञानसंस्था त्यांनीच केली स्थापन भारतरत्न पुरस्काराचे सांगा मानकरी कोण? ३) भारतीय कायदेपंडित धर्मशास्त्राचे अभ्यासक भारतरत्न पुरस्कारासह सन्मान लाभले कैक... ‘धर्मशास्त्राचा पंचखंडात्मक इतिहास’ ग्रंथ रचिला महामहोपाध्याय या पदवीचा मान कोणास मिळाला?
उत्तरे : 
१) लता मंगेशकर
२) जे. आर. डी. टाटा 
३) पांडुरंग वामन काणे 
Comments
Add Comment