Sunday, September 14, 2025

कशेडी घाटात एकेरी वाहतुक

कशेडी घाटात एकेरी वाहतुक

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा शनिवारी एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कोकणातील शिगमोत्सवापूर्वी कशेडी बोगद्यातून लहान वाहनांना कोकणात दाखल होण्याची परवानगी देण्यात आली असली तरी मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी कशेडी घाटाचा वापर करावा लागणार आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून चाचणी घेऊन अखेर शनिवारपासून मुंबईहून गोव्याकडे जाणारी वाहतूक ही कशेडी बोगद्यातून वळवण्यात आली आहे.

कशेडी बोगदा हा २ किलोमीटर लांबीचा असून या ठिकाणी ४० किलोमीटर प्रति तास एवढी वेग मर्यादा वाहनांनी पाळणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. कोकणातील शिमगोत्सव सणापूर्वी सरकारने कशेडी बोगदा किमान एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतल्याने कोकणवासीयांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

Comments
Add Comment