भरदिवसा घरात घुसून झाडल्या गोळ्या
नागपूर : नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर (Nagpur crime) आला आहे. सदर पोलीस स्टेशन हद्दीत राजनगर येथे एका व्यक्तीची बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ही मृत व्यक्ती जुने प्रेस फोटोग्राफर (Press photographer) असल्याची माहिती मिळत आहे. विनय उर्फ बबलू पूनेकर असं मृतकाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनय पूनेकर घरात एकटे असताना एक व्यक्ती आला आणि सायलेन्सर लावलेल्या पिस्तुलने त्यांच्यावर गोळी झाडून पळून गेला.
मृत पूनेकर यांना प्रेस फोटोग्राफर म्हणून काम सोडून अनेक वर्षे झाली आहेत. दरम्यान त्यांच्या घरात घुसून काहींनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
गेल्या काही दिवसांत राज्यात हत्येच्या घटनांमध्ये आणि गुन्हेगारींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या २४ दिवसांतील ही हत्येची १३वी घटना आहे. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.