Saturday, October 18, 2025
Happy Diwali

मनपाच्या पशु-पक्षी उपचार केंद्राचे लोकार्पण

मनपाच्या पशु-पक्षी उपचार केंद्राचे लोकार्पण

रेबिजमुक्त मीरा भाईंदरसाठी मोहिमेची सुरुवात

भाईंदर : रस्त्यावरील जखमी मोकाट पशू तसेच पक्षी यांना तात्काळ उपचार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच भटके श्वान, मांजरी यांच्यावर नसबंदी करण्यासाठी मीरा रोडच्या पूनम सागर भागात पशू-पक्षी उपचार केंद्राचे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या केंद्रातून रेबिजमुक्त मीरा भाईंदर मोहीम राबविण्यात येणार आहे.

एमबीएमसीने मीरा रोडच्या पूनम सागर भागात रस्त्यावरील जखमी मोकाट पशू तसेच पक्षी यांना तात्काळ उपचार उपलब्ध व्हावेत तसेच भटके श्वान, मांजरी यांच्यावर नसबंदी करण्यासाठी पशू-पक्षी उपचार केंद्र सुरू केले आहे. तसेच एक सामजिक संस्थेच्या सहकार्याने रेबिजमुक्त मीरा भाईंदर अभियान सुरू करण्यात येणार आहे.

या अभियानाअंतर्गत लसीकरण सुरू करण्यात येणार असून पुढच्या सात दिवसात १५ ते २० हजार मोकाट कुत्र्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी डॉक्टरांची १० पथके व ४० सहकारी इतके मनुष्यबळ वापरण्यात येणार आहे. मोहिमेची सुरुवात अतिरीक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांच्या हस्ते एका श्वानाचे लसीकरण करून करण्यात आले. याप्रसंगी उपायुक्त रवी पवार, शहर अभियंता दिपक खांबित, पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम निराटले, पशु वैद्यकीय डॉ. शितल भोये व कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Add Comment