नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी ही लढत रंगणार असल्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेसमध्ये एकमत झाले आहे. दिल्ली, गुजरातसह ४ राज्यांमध्ये आप- काँग्रेसमधील जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात आप आणि काँग्रेस यांच्यातील करार अंतिम झाला आहे. शनिवारी दिल्लीत दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची माहिती दिली. पत्रकार परिषदेला आपकडून आतिशी, संदीप पाठक आणि सौरभ भारद्वाज तर काँग्रेसकडून मुकुल वासनिक, दीपक बाबरिया आणि अरविंदर सिंग लवली उपस्थित होते.