Friday, May 23, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

Sleep: वयाच्या हिशेबाने किती तास झोप आहे गरजेची? घ्या जाणून

Sleep: वयाच्या हिशेबाने किती तास झोप आहे गरजेची? घ्या जाणून
मुंबई: धावपळीच्या या जगात लोकांना व्यवस्थित झोपही मिळत नाही आहे. अनेक तास मेहनत करूही तणाव काही पाठ सोडत नाही आहे. याचा सरळ परिणाम व्यक्तीच्या रात्रीच्या झोपेवर होत आहे. अनेकजण तणाव दूर करण्यासाी रात्रभर टीव्ही अथवा मोबाईलवर सिनेमा पाहत असतात. मात्र याचा थेट परिणाम झोपेवर होते.

त्यामुळे जर तुम्हाला हेल्दी राहायचे असेल तर कमीत कमी ७ तासांची रात्रीची झोप गरजेची आहे. इतकंच नव्हे तर चांगल्या आरोग्यासाठी तसेच वाढीसाठी प्रत्येक वया्च्या व्यक्तीनुसार झोपेची गरजही बदलते अशातच आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कोणत्या वयाच्या व्यक्तींना किती झोप गरजेची आहे ते

४ ते १२ महिन्याच्या मुलांना कमीत कमी १२ ते १६ तास झोप गरजेची आहे.
१ ते २ वर्षे वयाच्या मुलांसाठी ११ ते १४ तास झोप गरजेची आहे.
३ ते ५ वर्षाच्या मुलांसाठी ११ ते १४ तास झोप गरजेची आहे.
६ ते १२ वर्षे वयाच्या मुलांसाठी ९ ते १२ तास झोप गरजेची आहे.
जेव्हा मुले टीनएजमध्ये जातात तेव्बा ८ ते १० तास झोप गरजेची आहे.
वयाच्या १८ वर्षानंतर कमीत कमी ७ तास झोप गरजेची आहे.
तर ६० वर्षाहून अधिक वयाच्या लोकांना ७ ते ८ तास झोप गरजेची आहे.
Comments
Add Comment