Wednesday, December 31, 2025

रात्री उशिरा वाराणसीच्या रस्त्यावर उतरले पंतप्रधान नरेंद्र मोदी...

रात्री उशिरा वाराणसीच्या रस्त्यावर उतरले पंतप्रधान नरेंद्र मोदी...
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री उशिरा आपले विधानसभा क्षेत्र वाराणसीच्या रस्त्यावरून चालत निघाले. त्यांच्यासोबतच या दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही होते. पंतप्रधान मोदींनी सांगितले की त्यांीन रात्रीच्या वेळेस शिवपूर-फुलवारिया लहरतारा मार्गाचे निरीक्षण केले. याचे फोटोही शेअर करण्यात आले. यात त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सुरक्षाकर्मचारी आहेत.   पंतप्रधान मोदी वाराणीसाल पोहोचताच रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ते रस्त्याचे निरीक्षण करण्यासाठी पोहोचले. पंतप्रधान मोदींनी ट्वीट केले काशीमध्ये येऊन शिवपूर-फुलवारिया-लहरतारा मार्गाचे निरीक्षण केले. या परियोजनेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले होते. या रस्त्यामुळे वाराणसीच्या दक्षिण भागात राहणाऱ्या लोकांसाठी एअरपोर्ट, लखनऊ, आझमगढ आणि गाझीपूर जाणे सोपे झाले आहे.  
Comments
Add Comment