Saturday, May 10, 2025

देशमहत्वाची बातमी

Rahul Gandhi : झारखंड हायकोर्टाने राहुल गांधींची याचिका फेटाळत दिला मोठा झटका!

Rahul Gandhi : झारखंड हायकोर्टाने राहुल गांधींची याचिका फेटाळत दिला मोठा झटका!

अमित शाहांविरोधात केलेलं वक्तव्य राहुल गांधींना भोवणार


मुंबई : झारखंड उच्च न्यायालयाने (Jharkhand Highcourt) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची याचिका फेटाळून लावत मोठा झटका दिला आहे. राहुल गांधी यांनी तत्कालीन भाजप प्रमुख आणि विद्यमान गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना 'हत्येचा आरोपी' म्हणून संबोधल्याबद्दल मानहानीचा (Defamation) खटला रद्द करण्याची मागणी करणारी ती याचिका होती. ती फेटाळून लावल्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढणार आहेत. आता या प्रकरणात राहुल गांधी यांच्याविरोधात कनिष्ठ न्यायालयात खटला चालवला जाणार आहे.


या आठवड्याच्या सुरुवातीला राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यांना २५ हजार रुपयांच्या जामीनावर आणि तेवढ्याच रकमेच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, आता त्यांची याचिका झारखंड हायकोर्टाने फेटाळली आहे.



नेमकं प्रकरण काय आहे?


राहुल गांधी यांनी २०१८ साली बेंगळुरू येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय मिश्रा यांनी राहुल गांधी विरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर त्यांच्यावरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. राहुल गांधी यांनी ट्रायल कोर्टमध्ये सुरू असलेली कारवाही रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. १६ फेब्रुवारी रोजी राहुल गांधी यांच्याकडून लिखीत बाजू कोर्टात मांडण्यात आली होती. यानंतर जस्टिस अंबुज नाथ यांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला होता.



यापूर्वी राहुल गांधींना मोदींवरील टिप्पणीदेखील भोवली


यापूर्वी मोदी आडनावाबद्दल अक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी सूरत कोर्टाने राहुल गांधी यांना शिक्षा सुनावली होती. त्याच आधारावर त्यांना लोकसभा सदस्यत्व देखील गमवावे लागले होते. मात्र नंतर सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिली आणि त्यानंतर राहुल गांधीची सदस्यता पुन्हा बहाल करण्यात आली होती.

Comments
Add Comment