Thursday, January 29, 2026

IND vs ENG: पदार्पणाच्या कसोटीत चमकला आकाशदीप, ज्यो रूटने वाढवल्या टीम इंडियाच्या अडचणी

IND vs ENG: पदार्पणाच्या कसोटीत चमकला आकाशदीप, ज्यो रूटने वाढवल्या टीम इंडियाच्या अडचणी

रांची: रांची कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडची धावसंख्या ७ बाद ३०२ इतकी झाली. ज्यो रूट १०६ धावा करून नॉटआऊट परतला. तर ओली रॉबिन्सन ३१ धावांवर नाबाद आहे. याआधी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लडचा सलामीवीर बेन डकेट आणि जॅक क्राऊलीने पहिल्या विकेटसाठी ४७ धावा केल्या.

ज्यो रूटने ठोकले शतक, मात्र फलंदाजांनी केली निराशा

इंग्लंडचे टॉप ३ फलंदाज ५७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर जॉनी बेअरस्ट्रॉने काही चांगले शॉट लगावले. माज्ञ रवी अश्विनच्या बॉलवर बाद झाला. इंग्लंडचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेले. मात्र दुसरीकडे ज्यो रूटने एक बाजू लावून धरली. ज्यो रूटने बेन फोक्सशिवाय खालच्या फळीतील फलंदाजांना हाताशी घेत संघाला सन्मानजनक धावसंख्येवर आणून ठेवले.

इंग्लंडसाठी सलामीवीर जॅक क्राऊलीने ४२ धावा केल्या. तर बेन डकेट ११ धावा करून बाद झाला. ओली पोप आपले खातेही खोलू शकला नाही. जॉनी बेअरस्ट्रॉने ३८ धावा केल्या. कर्णधार बेन स्टोक्स ३ धावा करून बाद झाला.

आकाशदीपने आपल्या डेब्यू टेस्टमध्ये केला जलवा

भारतीय गोलंदाजांबाबत बोलायचे झाल्यास आकाशदीपने आपल्या कसोटी पदार्पणात शानदार गोलंदाजी केली. आकाश दीपने इंग्लंडच्या टॉप ३ फलंदाजांना आपली शिकार बनवले. मोहम्मद सिराजला २ बळी मिळवता आले. रवी अश्विन आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकाला एक-एक यश मिळाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा