Monday, October 27, 2025
Happy Diwali

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन
मुंबई: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. हिंदुजा रुग्णालयात त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. गुरूवारी रात्रीच्या वेळेस त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आयसीयूमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू तसेच महाराष्ट्रातील बिगर काँग्रेसी पहिले मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकारणापासून दूर होते. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासादरम्यान अनेक महत्त्वाची पदे भूषवली.

अशी झाली राजकीय कारकीर्द सुरू

सुरूवातीला शिवसेनेकडून ते विधानपरिषदेवर निवडून आले. त्यांनी शिवसेनेकडून मुंबईचे महापौरपदही भू।वले. १९९५मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती. मनोहर जोशी यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेजजवळच्या W54 या त्यांच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत ठेवले जाणार आहे. त्यानंतर अंत्ययात्रा सुरू होईल. दादरच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >