मनोहर जोशींनी राज्याच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली
नवी दिल्ली : मनोहर जोशी यांच्या निधनाने दुःख झाले. ते एक दिग्गज नेते होते, ज्यांनी लोकसेवेत अनेक वर्षे घालवली. महापालिका, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदींनी जोशींसोबतची आठवण एक्स पोस्ट करत शेअर केली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी लोकसभा अध्यक्ष म्हणून आपल्या कार्यकाळात आपल्या संसदीय प्रक्रियेला अधिक गतिमान आणि सहभागी बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. मनोहर जोशी जी चारही विधीमंडळात काम करण्याचा बहुमान लाभलेले आमदार म्हणून त्यांच्या मेहनतीबद्दलही स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांप्रती संवेदना. ओम शांती, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी मनोहर जोशींना श्रद्धांजली वाहिली आहे.