Saturday, July 6, 2024
Homeदेशअहमदाबाद-वाराणसी दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, असा आहे कार्यक्रम

अहमदाबाद-वाराणसी दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, असा आहे कार्यक्रम

नवी दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी २२ फेब्रुवारीला सुरत जिल्ह्यातील काकरापार परमाणु उर्जा स्टेशनमध्ये एकूण १४०० मेगावॅट क्षमतेचे दोन नवे दबावयुक्त भारी जल रिएक्टर देशाला समर्पित करतील. यासोबतचच ते गुजरातमधील आपल्या एकदिवसीय यात्रेदरम्यान अनेक नव्या योजनांचे उद्घाटन करतील. अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली.

गुजरातमधील पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम

पंतप्रधान २२ फेब्रुवारीला सकाळी १०.४५ मिनिटांनी अहमदाबादच्या गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या सुवर्णजयंतीमध्ये सहभागी होतील
दुपारी १२.४५ वाजता पंतप्रधान मेहसाणाला पोहोचतील. येथे वलीनाथ महादेव मंदिरात पुजा आणि दर्शन करतील.
दुपारी १ वाजता पंतप्रधान मोदी तारभ, मेहसाणामध्ये सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतील. येथे अनेक योजनांचे उद्घाटन करतील.
त्यानंतर पंतप्रधान नवसारीला पोहोचतील. येथेही अनेक योजनांचे उद्घाटन केले जाईल.
संध्याकाळी ६.१५ वाजता पंतप्रधान काकरापार परमाणु उर्जा स्टेशनचा दौरा करतील.

वाराणसी दौऱ्यावर पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर २२ आणि २३ फेब्रुवारीला वाराणसी दौऱ्यावर असतील. पंतप्रधान वाराणसीमध्ये साधारण १४ हजार कोटी रूपयांच्या २३ परियोजनांचे लोकार्पण आणि १३ परियोजनांचे शिलान्यास करतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -