मुंबई: कधीकाळी तंबूत रात्र घालवाव्या लागणाऱ्या भारताचा क्रिकेटर यशस्वी जायसवालने आज कोट्यावधींचे घर खरेदी केले आहे. सध्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वी जायसवालची बॅट तळपत आहे. या मालिकेतील सुरूवातीच्या ३ कसोटीत सामन्यांत जायसवालने २ दुहेरी शतक ठोकले आहेत. २२ वर्षीय हा युवा सलमीवीर आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.
यशस्वीने वांद्रे पूर्व येथे टेन बीकेसी प्रोजेक्टमध्ये ५.३८ कोटींचे एक घर खरेदी केले आहे. यशस्वी जायसवालने जे घर खरेदी केले आहे ते ११०० स्क्वे फूटचे आहे. जायसवालने याचे रजिस्ट्रेशन ७ जानेवारी २०२४मध्ये केले आहे. दरम्यान, सध्या अपार्टमेंट अंडर कन्स्ट्रक्शन आहे.
यशस्वी जायसवालचे लहानपण खूप कठीण स्थितीत गेले. क्रिकेटवरील प्रेमामुळेच त्याला यूपीच्या भदोही येथून मुंबईला घेऊन आले. यशस्वीने मुंबईच्या आझाद मैदानात क्रिकेटचे बारकावे शिकले. त्यावेळेस तो आझाद मैदानात तेथेच तंबूत झोपायचा. अनेकदा मुलाखतीत त्याने ही बाब सांगितली आहे. यशस्वीने सांगितले होते की कधी कधी पावसामुळे तंबूत पाणीही याचे मात्र त्याच्याकडे रात्र घालवल्याशिवाय कोणताही पर्याय नसायचा.
यशस्वी जायसवालच्या नेटवर्थमध्ये चांगलीच वाढ होत आहे. गेल्या वर्षी त्याने मुंबईच्या ठाणेमध्ये ५ बीएचके घर खरेदी केले होते. यशस्वीची वार्षिक कमाई ४ कोटींपेक्षा अधिक आहे. तर नेटवर्थ २ मिलियनहून अधिक आहे. भारतीय रूपयांमध्ये ही १६ कोटी आहे. यशस्वी जायसवाल आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसेल.