Thackeray Group : माझा पक्षात टिशू पेपर म्हणून वापर केला! शिल्पा बोडखे यांचा उबाठाला रामराम

काम करणार्‍यांपेक्षा उबाठामध्ये चुगल्या चहाड्या करणार्‍यांना अधिक महत्त्व : शिल्पा बोडखे


मुंबई : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जवळ आलेल्या असताना ठाकरे गटाला (Thackeray Group) धक्क्यांवर धक्के पचवावे लागत आहेत. अनेक बडे बडे नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत, तर अनेक महत्त्वाचे नेते ईडीच्या (ED) कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे ठाकरे गट अडचणीत असतानाच आता शिल्पा बोडखे (Shilpa Bodakhe) यांनी देखील पुर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख या आपल्या पदाचा राजीनामा देत उबाठाला रामराम ठोकला आहे. एवढंच नव्हे, तर पत्राद्वारे त्यांनी उबाठा गटावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.


शिल्पा बोडखे एक ट्विट शेअर करत म्हणाल्या आहेत, माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरेजी यांच्या शद्बाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहेत, त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे. मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्याबद्दल दोघींचे अभिनंदन. पुढे देखील शिवसेना भवनात बसून असेच कार्य करत रहा. आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटणाचा वास गेला असेलच, पुन्हा नागपूरात येवून सावजी वर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा, असा टोला शिल्पा बोडखे यांनी आपल्या ट्विटमध्ये लगावला आहे.





शिल्पा बोडखे यांनी पत्रात काय म्हटले?


पत्रात त्यांनी लिहिले आहे की, आपण शिवेसेनेच्या पूर्व महिला आघाडी संपर्क प्रमुख व प्रवक्ता या पदावर प्रामाणिकपणे काम करत संघटना वाढवण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेना भवनात बसून विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांनी सतत षडयंत्र रचून वारंवार संघटन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला असे मला वाटते.


शिवसेना पक्षात शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला किंमत आहे, पण आता मला कळाले की येथे विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांच्याकडे पक्षाचे पूर्ण अधिकार दिले असून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला देखील त्या जुमानत नाहीत.


मी पक्षाचे अहोरात्र प्रामाणिकपणे काम करत राहिले आणि विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या शिवसेना भवनात बसून षडयंत्र रचत बसल्या. मला सोशल मीडियाचे काम करायचे नाही असं पत्र मी आदित्य ठाकरे यांना पाठवले, परंतु विशाखा राऊत यांना मी काम करू नये आणि त्रस्त होऊन राजीनामा द्यावा असं वाटत आहे.


जर यांना संघटना वाढवण्यापेक्षा षडयंत्र रचण्यात एवढा आनंद होत असेल तर मी आपल्या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि प्रवक्ता पदाचा राजीनामा देत आहे. माझा पक्षात टिश्यू पेपर म्हणून वापर केल्याबद्दल धन्यवाद. पुढे कोणाचे असे राजकीय आयुष्य बरबाद करून नका, नाहीतर कोणताही मराठी माणूस मराठी माणसाच्या आणि पक्षाच्या पाठीशी उभा राहणार नाही.


कारण शिवसेना पक्षात काम करणाऱ्या लोकांपेक्षा येथे चुगल्या चहाड्या करणाऱ्या आणि षडयंत्र रचणाऱ्यांना जास्त महत्व आहे.

Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह