Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीExam Tips : बोर्डाच्या परीक्षेसाठी असा करा अभ्यास, या आहेत टिप्स

Exam Tips : बोर्डाच्या परीक्षेसाठी असा करा अभ्यास, या आहेत टिप्स

मुंबई: बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना प्रचंड ताण असतो. या टेन्शनमुळे जर तुम्ही दिवसभर अभ्यासच करत राहण्याचा विचार करताय तर बंद करा. कमीत कमी ७ तासांची आपली झोप पूर्ण करा.

स्टडी टेबल आपल्या बोर्ड परीक्षेच्या टेबलप्रमाणे बनवा. प्रयत्न करा की प्रत्येक धड्यातून जे महत्त्वाचे आहे ते कव्हर होईल. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा.

दर अर्ध्या तासाने पाणी प्या. पाणी प्यायल्याने तुमचे शरीर फ्रेश राहील.

या काळात जड पदार्थ तसेच फास्ट फूड खाऊ नका. घरात बनवलेले हलकेफुलके आणि हेल्दी जेवण घ्या.

परीक्षेला जाताना रिकाम्या पोटी जाऊ नका. घरातून बाहेर पडता हलका आहार घेऊन बाहेर पडा.

तसेच परीक्षेचा अतिरिक्त ताण घेऊ नका. अपेक्षांचे ओझे बाळगत पेपरला जाण्याऐवजी शांत आणि प्रसन्न मनाने पेपर सोडवा.

पेपर लिहिताना आपल्या हस्ताक्षराचीही काळजी घ्या. अनेकदा घाईघाईत सोडवण्याच्या नादात आपले हस्ताक्षर बिघडून जाते. मात्र याची काळजी घ्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -