Monday, May 12, 2025

देशमहत्वाची बातमी

Ram Mandir: प्राणप्रतिष्ठेचा एक महिना... जाणून घ्या महिन्याभरात किती भक्तांनी घेतले श्रीरामांचे दर्शन

Ram Mandir: प्राणप्रतिष्ठेचा एक महिना... जाणून घ्या महिन्याभरात किती भक्तांनी घेतले श्रीरामांचे दर्शन

अयोध्या: अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्मितीला एक पूर्ण महिना झाला आहे. गेल्या महिन्यात याच दिवशी श्रीरामांची भव्य राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भव्य राम मंदिराचे उद्घाटन केले होते आणि श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.


अयोध्येत भव्य आणि दिव्य राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा समारंभाच्या एक महिन्यानंतरही अयोध्येत येणाऱ्या रामभक्तांचा उत्साह काही कमी झालेला नाही. श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत आजही रामभक्तांची प्रचंड गर्दी होत आहे. लाखोंच्या संख्येने भक्तगण अयोध्येत दर्शनासाठी येत आहेत.


ज्याप्रकारे अयोध्येत आता रामभक्तांची गर्दी उसळत आहे त्यावरून हे सिद्ध होते की मंदिरात प्राण प्रतिष्ठेचा सोहळा पार पडून महिना झाल्यानंतरही दर्शनासाठी उत्साह कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात २२ जानेवाीला भव्य राम मंदिरात भगवान श्री रामांची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.


याच्या एक महिन्यानंतरही अयोध्येत उत्सव साजरा केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ जानेवारी ते २२ फेब्रुवारीपर्यंत तब्बल ६० लाख भक्तांनी श्रीरामांचे दर्शन घेतले आहेत. प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर पहिल्या १० दिवसांत २५ लाखाहून अधिक भक्तांनी दर्शन घेतले.


फेब्रुवारीमध्ये दर दिवसाला साधारण एक ते दोन लाख भक्त राम मंदिरात पुजा-अर्चनासाठी पोहोचत आहेत. आतापर्यंत मंदिरात आलेल्या भक्तांचा साधारण आकडा ५५-६० लाख इतका आहे.

Comments
Add Comment