नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत असा अनेक भारतीयांना विश्वास आहे. याला आता एका सर्व्हेची जोड मिळाली आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान मोदींनी जगातील अनेक बड्या आणि शक्तिशाली देशांच्या प्रमुखांना मागे टाकले आहे. मॉर्निंग कन्सल्ट सर्व्हे एजन्सीने केलेल्या जागतिक सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि जर्मन चान्सलर ओलाफ सोझ यांच्यापेक्षाही पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मॉर्निंग कन्सल्टच्या जागतिक सर्वेक्षणाच्या क्रमवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक ७७ टक्के मते मिळाली आहेत, तर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर ६४ टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. स्वित्झर्लंडचे नेते अलेन बेरसेट यांना ५७ टक्के मते मिळाली आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या रँकिंगमध्ये अमेरिका आणि इंग्लंडचे दोन्ही प्रसिद्ध नेते, जो बायडेन आणि ऋषी सुनक त्यांच्यापेक्षा खूप मागे आहेत.
हे सर्वेक्षण नुकतेच मॉर्निंग कन्सल्टने ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान केले होते. पंतप्रधान मोदी हे जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्यांची लोकप्रियता कायम आहे. सर्वेक्षणातील आकडेवारी या बाबतीत सर्वात महत्त्वाची आहे की, रँकिंगमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना ३७ टक्के, ऋषी सुनक आणि ओलाफ यांना २० टक्के मते मिळाली आहेत. पंतप्रधान मोदी हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोकप्रिय चेहरा असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…