Friday, October 17, 2025
Happy Diwali

मुकेश-नीता अंबांनींनी होणाऱ्या सुनेला दिली ४.५ कोटींची कार

मुकेश-नीता अंबांनींनी होणाऱ्या सुनेला दिली ४.५ कोटींची कार

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत बिझनेसमन मुकेश अंबानी(mukesh ambani) आणि त्यांची पत्नी नीता अंबानी(neeta ambani) यांचा सर्वात लहान मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाआधी प्रीवेडिंग सेलिब्रेशन सुरू झाले आहे. या लग्नाची चर्चा देशभरात होत आहे. लग्नाच्या प्रीवेडिंग कार्यक्रमाच्या आधी अंबानी कुटूंबाच्या होणाऱ्या सुनेला लाखो नव्हे कोट्यावधी किंमतीची गिफ्ट दिली जात आहेत.

नुकतीच बातमी समोर आली की होणारे सासू-सासरे नीता आणि मुकेश अंबानी यांनी महागडे गिफ्ट दिले आहे. अंबानी कुटुंबातील या नव्या सुनेला ४.५ कोटींची कार गिफ्ट मिळाली आहे.

नीता अंबानी यांनी राधिका मर्चंटला लक्ष्मी-गणेशचे गिफ्ट हँपर दिले. यात लक्ष्मी-गणेशच्या मूर्तीसोबत चांदीची तुळसही आहे. यात चांदीचा स्टँडही आहे.

राधिकाला मिळाली Bentley Continental GTC Speed

मुकेश अंबानी यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांना Bentley Continental GTC Speed गिफ्टमध्ये दिली आहे. देशात फार कमी सेलिब्रेटी आहेत ज्यांच्याकडे ही कार आहे. यात विराट कोहली, आमिर खान, अभिषेक बच्चन यांच्याकडे ही कार आहे. याची किंमत तब्बल ४.५ कोटी रूपये आहे.

Comments
Add Comment