Saturday, March 15, 2025
Homeताज्या घडामोडीMarathi Movie : थोडं लूझ थोडं टाईट कॅरेक्टर... काय आहे अलीबाबा आणि...

Marathi Movie : थोडं लूझ थोडं टाईट कॅरेक्टर… काय आहे अलीबाबा आणि चाळीशीतल्या चोरांचा मॅटर?

सुबोध भावे, मुक्ता बर्वे आणि तगड्या स्टारकास्टसह नवीन चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला…

मुंबई : अलीबाबा आणि चाळीस चोरांची कथा आपण लहानपणी ऐकली, पण अलीबाबा आणि चाळीशीतल्या चोरांची कथा ऐकली आहे का? या चोरांची एक भन्नाट, धमाकेदार आणि हलकीफुलकी कथा दाखवणारा नवा मराठी चित्रपट (New Marathi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाळीशीतले हे चोर विवाहित आहेत हा त्यांचा गुन्हा आहे, अशा आशयावर आधारलेला ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ (Alibaba ani chalishitale chor) हा चित्रपट येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या चित्रपटाचा टीझर आऊट (Teaser out) झाला आहे.

खरं तर विवाहित असणं म्हणजे गुन्हा नव्हे, पण चित्रपटाच्या टीझरमध्ये प्रत्येक कलाकार हातात आरोपीची पाटी घेऊन उभा आहे, आणि त्या पाटीवर ‘गुन्हा-विवाहित’ असं लिहिलं आहे. शिवाय या चोरांचं वयदेखील चाळीशीच्या आसपासच आहे, हे पाटी वाचून लक्षात येतं. आता यामागे नेमकं काय रहस्य आहे, हे चित्रपट पाहिल्यानंतरच प्रेक्षकांच्या लक्षात येणार आहे.

या चित्रपटातून तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुबोध भावे (Subodh Bhave), मुक्ता बर्वे (Mukta Barve) यांच्यासह उमेश कामत (Umesh Kamat), श्रुती मराठे (Shruti Marathe), अतुल परचुरे (Atul Parchure), मधुरा वेलणकर (Madhura Velankar), आनंद इंगळे (Anand Ingale) ही कलाकार मंडळी यामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज आहेत. आजारपणानंतर अतुल परचुरे कामात सक्रिय झाले असून त्यांचा हा चित्रपट पाहण्यास चाहते उत्सुक असणार आहेत.

‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटाची निर्मिती नितीन वैद्य प्रोडक्शन्स आणि मृद्गंध फिल्म्सने केली आहे. चित्रपटाचे लेखन विवेक बेळे यांनी केले आहे तर दिग्दर्शनाची जबाबदारी आदित्य इंगळे यांनी सांभाळली आहे. २९ मार्च रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -