Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीHorse market : देवगड येथे शनिवारी भव्य अश्वप्रदर्शन आणि अश्व बाजार

Horse market : देवगड येथे शनिवारी भव्य अश्वप्रदर्शन आणि अश्व बाजार

संगमनेर : हिवरगाव पावसा येथील श्रीक्षेत्र देवगड यात्रे निमित्ताने शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा. सारंगखेडा नंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा अश्व बाजार, अश्व प्रदर्शन व अश्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा काँग्रेस विधिमंडळाचे पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात व कर्नाटक राज्याचे खाण व भूविज्ञान मंत्री विनय कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याची माहिती अश्वप्रेमी असोसिएशनचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना रणजितसिंह देशमुख म्हणाले की, सारंगखेडा पाठोपाठ संगमनेर मध्ये होत असलेले हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे अश्वप्रदर्शन आणि अश्व बाजार ठरले आहे. यावर्षी या प्रदर्शनाचे हे सातवे वर्ष असून या कार्यक्रमासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी महसूल व कृषीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, कर्नाटक राज्याचे माजी खाण व बहुजन मंत्री विनय कुलकर्णी, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, जयहिंदचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, हिवरगाव पावसाचे सरपंच सुभाष गडाख, देवगड देवस्थानचे अध्यक्ष उत्तम नाना जाधव यांचेसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जगभर अश्वाच्या विविध प्रजाती आणि त्यांचे विविध गुणधर्म आहेत .अगदी शिवकालापासून अश्वांना विशेष महत्त्व आहे. संगमनेर मध्ये दरवर्षी भव्य अश्वप्रदर्शन भरवले जात असून यामध्ये विविध राज्यांमधील अनेक अश्वपालक आपले जातिवंत अश्व घेऊन सहभागी होतात. यावर्षीही भारतासह विविध देशातून अनेक जातीवंत अश्व सहभागी होणार आहेत. याचबरोबर अश्वांचे नृत्य आणि अश्वांच्या विविध स्पर्धाही होणार आहे. यावर्षीचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच घोडा बिग जस्पर हाही सहभागी होणार आहे.

तरी या अश्व स्पर्धा व अश्व बाजारसाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, उत्तमराव जाधव ,रफिक फिटर, मकरंद मुळे, यांसह शिवराज्य निर्माण संघटना व संगमनेर तालुका अश्वप्रेमी असोसिएशनच्या सर्व सदस्यांच्या वतीने वतीने करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -