Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीमनोज जरांगे हा शरद पवारांचाच माणूस!

मनोज जरांगे हा शरद पवारांचाच माणूस!

बारसकरांनंतर संगीता वानखेडे यांनी केले मनोज जरांगेंवर गंभीर आरोप

पुणे : अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांच्यापाठोपाठ आणखी एका मराठा आंदोलक महिला आणि स्त्री शक्ती संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष संगीता वानखेडे (Sangeeta Wankhede) यांनी देखिल मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संगीता वानखेडे या पुण्यातील चाकणमधील आहेत.

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राला वेडं बनवले. तिथे दंगल घडली का घडवली, याचा सरकारने शोध लावावा. मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा हात आहे, असे गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी केले आहेत. संगीता वानखेडे या मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा आंदोलनात (Maratha reservation) कार्यरत होत्या. मात्र त्यांनी आता जरांगे यांच्या आंदोलनातून फारकत घेतल्यानंतर, जरांगेंवर घणाघाती टीका केली.

मनोज जरांगे कोण हे मीडियाला सुद्धा माहिती नव्हते. मनोज जरांगे भोळा भाबडा माणूस, मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस, म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मनोज जरांगे यांची बाजू घेऊन छगन भुजबळ यांना मी ट्रोल केले होते तेव्हा ते लोक मला गलिच्छ भाषेत बोलत होते. परंतू दीड महिन्यापासून मी मनोज जरांगे यांचा विरोध करतेय, विषाची बाटली घेऊन मी सोशल मीडियावर बसतेय. मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते, फक्त एक फोन ज्यांचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते. तो फोन शरद पवार यांचाच होता, असा गंभीर आरोपही संगीता वानखेडे यांनी केला.

मनोज जरांगे हे शरद पवार यांचा माणूस आहेत. शरद पवार हे मनोज जरांगे यांना फोन करत होते. पण मराठ्यांना आरक्षण मिळत होते म्हणून अनेक गोष्टींकडे मी कानाडोळा केला. पुण्यात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. टोपी घालून मनोज जरांगेंसोबत आम्ही आख्खं पुणे फिरलो. शरद पवार जसे सांगतात तसेच मनोज जरांगे करतात. आरक्षणाचे मारेकरी शरद पवार आहेत, असे देखिल संगीता वानखेडे म्हणाल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -