
मुंबई: हैदराबादने मेघालयला रणजी ट्रॉफी(ranji trophy) २०२३-२३च्या प्लेट ग्रुप फायनल सामन्यात ५ विकेटनी हरले. तिलक वर्माच्या नेतृत्वात हैदराबाद संघासाठी नितेश रेड्डी आणि प्रग्नय रेड्डी यांनी शतक ठोकले. यातच हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा केली की त्यांची टीम जर पुढील ३ वर्षात ट्रॉफी जिंकत अशेल तर प्रत्येक खेळाडूला एक कोटी रूपये आणि बीएमडब्लू कार दिली जाईल.
खरंतर, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. याच्या माध्यमातून त्यांनी घोषणा केली की पुढील तीन वर्षांत रणजी ट्रॉफी जिंकल्यास प्रत्येक खेळाडूला १ कोटी रूपये आणि १ बीएमडब्लू कार गिफ्ट दिली जाईल. त्यांची ही घोषणा सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनाही टॅग करण्यात आले आहे.
BMW CAR TO EACH PLAYER & 1 Cr cash Reward to Team.
If the team wins the Ranji Elite Trophy in Next 3 years.@hydcacricket @BCCI @JayShah @sachin_rt @DHONIism @IPL @srhfansofficial @CSKFansOfficial pic.twitter.com/cONhQQBTVg
— Jagan Mohan Rao Arishnapally (@JaganMohanRaoA) February 20, 2024
बक्षिसाच्या रकमेवरून इंडियन प्रीमियर लीगची चर्चा होत आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंवर संघ कोट्यावधी रूपये खर्च करत असतात. मात्र आता रणजीमध्ये इतकी मोठी घोषणा चर्चेत आली आहे