Tuesday, July 1, 2025

IND vs ENG: चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, राहुल आणि जसप्रीत बाहेर

IND vs ENG: चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, राहुल आणि जसप्रीत बाहेर

मुंबई: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि विकेटकीपर फलंदाज केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून बाहेर झाले आहे. मुकेश कुमारला रांची कसोटीसाठी भारतीय संघात सामील करण्यात आले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना २३ फेब्रुवारीपासून रांचीमध्ये खेळवला जाईल. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ २-१ अशा आघाडीवर आहे.


बीसीसीआयने सांगितले की मोठी मालिका पाहता बुमराहला रिलीज करण्यात आले आहे. तर केएल राहुल फिटनेसमुळे चौथ्या कसोटीत खेळू शकणार नाही. राहुल तिसऱ्या कसोटीतही खेळला नव्हता. इतकंच नव्हे तर धरमशाला येथे होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यातही तो खेळेल की नाही हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे.



चौथ्या कसोटीतून बाहेर जसप्रीत आणि राहुल


वेगवान गोलंदाज मनोज कुमारचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याला तिसऱ्या कसोटीआधी रिलीज कऱण्यात आले होते. तिसऱ्या कसोटीआधी केएल राहुलच्या स्थानी देवदत्त पड्डिकलला संघात स्थान मिळाले होते. पड्डिकल संघासोबत राहील आणि चौथ्या कसोटीत त्याला पदार्पणाची संधी मिळू शकते. याशिवाय रजत पाटीदारला प्लेईंग ११मध्ये स्थान मिळणार नाही. दोन्ही कसोटीत रजत पाटीदार काही खास कामगिरी करू शकला नाही.



भारतीय संघ २-१ने आघाडीवर


पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत रोहित शर्माचा संघ २-१ अशा आघाडीवर आहे. पहिला सामना इंग्लंडने जिंकला, दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला. राजकोटमधील तिसऱ्या सामन्यात भारताने ४३४ या मोठ्या धावसंख्येने सामना जिंकला.

Comments
Add Comment