ऑल द बेस्ट! बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात

मुंबई: बारावी इयत्तेच्या बोर्डाच्या परीक्षेला आज बुधवारपासून सुरूवात आहे. राज्यातील १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. या परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार घडू नयेत यासाठी परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी भरारी पथक नेमण्यात आली आहेत.


यंदाची बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान होणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाईन पद्धतीने भरून घेतले जातील. राज्यात विज्ञान शाखेसाठी ७ लाख ६० हजार ४६ विद्यार्थी, कला शाखेसाठी ३ लाख ८१ हजार ९८२ विद्यार्थी, वाणिज्य शाखेसाठी ३ लाख २९ हजार ९०५ विद्यार्थी, व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी ३७ हजार २२६ विद्यार्थी, आयटीआयसाठी ४ हजार ७५० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.



अर्धा तास आधी उपस्थित रहा


परीक्षेसाठी किमान अर्धा तास आधी उपस्थित रहावे. पेपर सुरू झाल्यानंतर दहा मिनिटांनी विद्यार्थी आल्यास त्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही.


विद्यार्थ्यांना शेवटी दहा मिनिटे जास्त मिळणार आहेत. त्यावेळेस आपण लिहिलेली उत्तरपत्रिकेच्या मुख्यपृष्ठावरील माहिती योग्य असल्याची खात्री करावी. तसेच उत्तरे आणि प्रश्नांचे क्रमांकही पुन्हा एकदा तपासून खात्री करून घ्यावीत.

Comments
Add Comment

पंढरपुरात मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पंढरपूर : पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्यावतीने उभारण्यात आलेल्या धर्मशाळा-भक्तनिवासाच्या

Onion Farmers : केंद्र सरकारकडून कांदा उत्पादकांना दिलासा

सरकारी खरेदीदरात १३ टक्क्यांनी वाढ; प्रति क्विंटल २ हजार १२५ रुपये दर निश्चित मुंबई : कांदा उत्पादक

Ratnagiri News : धक्कादायक! दिड वर्षांच्या चिमुकल्यासह आईने मारली मांडवी एक्सप्रेसमधून उडी

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक (Ratnagiri News) अत्यंत धक्कादायक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

Jalna Bus Accident : जालना-बीड महामार्गावर भीषण अपघात! दोन एसटी बसची समोरासमोर धडक; चालकांसहअनेक प्रवासी जखमी

जालना : जालना-बीड महामार्गावर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. अंबड तालुक्यातील शहापूरजवळ गल्हाटी नदीच्या पुलावर

Devendra Fadnavis : हवामान विभागाचे अलर्ट पाहूनच घराबाहेर पडा!

मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन; कनेक्टिंग लिंकवरील खड्ड्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर मुंबई : "राज्यात

KOYANA DAM : कोयना धरणात पाण्याची झपाट्याने वाढ; २४ तासांत २.१६ टीएमसीची आवक, विसर्गाबाबत प्रशासन सतर्क

कराड (सातारा) : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ